शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू उत्खनन; सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 00:25 IST

डोंगरगाव शिवारातील दुधना नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांविरूध्द दरोडा प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी रात्री कारवाई केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : तालुक्यातील डोंगरगाव शिवारातील दुधना नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांविरूध्द दरोडा प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी रात्री कारवाई केली. या कारवाईत दोन वाहने, एक जेसीबीसह ८५ लाख ६० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सहा जणांविरूध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव शिवारातील दुधना नदीपात्रात जेसीबीद्वारे वाळूचा उपसा करून वाहतूक केली जात असाल्याची माहिती दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रमुख पोनि. यशवंत जाधव यांना मिळाली होती. या माहितीवरून पथकाने शुक्रवारी रात्री डोंगरगाव शिवारातील दुधना नदीपात्रात कारवाई केली. त्यावेळी नदीपात्रातून वाळू घेऊन जाणा-या वाहनाच्या (क्र. एम.एच.२१- डी.एच. २३८९) चालकाकडे रॉयल्टीबाबत विचारणा केली. चालकाने रॉयल्टीची कागदपत्रे नसल्याचे सांगितले. चौकशीत चालकाने आपले नाव शंकर कडूबा खंडाळे (रा. घाणेवाडी ता. जालना) व वाहन मालकाचे नाव समाधान दगडूबा पाळोदे (रा. टाकळी ता. भोकरदन) असल्याचे सांगितले. पोलिसांनी यावेळी सहा ब्रास वाळूसह वाहन जप्त केले. या कारवाईचा पंचनामा सुरू असताना नदीपात्रात एका विनानंबरच्या जेसीबीद्वारे एका वाहनात (क्र.एम.एच.-४२८९) वाळू भरण्यात येत असल्याचे दिसून आले. त्या वाहन चालकाकडे विचारणा केल्यानंतर त्यानेही रॉयल्टीची पावती नसल्याचे सांगितले. यावेळी जेसीबी, वाहनासह सहा ब्रास वाळू जप्त करण्यात आली. तेथे असलेल्या चालकाकडे चौकशी केल्यानंतर वाहन चालकाने त्याचे नाव अर्जुन भीमराव लोहकरे (रा. मानदेऊळगाव ता.बदनापूर), वाहन मालक अर्जुन दगडूबा पाळोदे (रा. टाकळी ता. भोकरदन), जेसीबी चालक शेख शहारूख शेख अख्तर (रा. मुबारकपूर मेवत हरियाणा ह.मु.चिंचोली ता.भोकरदन), व जेसीबी मालक मधुकर साहेबराव हिवाळे (रा. चिंचोली ता.भोकरदन) असल्याचे सांगितले.जेसीबी, दोन हायवा जप्तया दोन्ही कारवाईत एक जेसीबी, दोन हायवा, वाळू असा एकूण ८५ लाख ६० हजार रूपयांचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला. या प्रकरणी संबंधित चालक, वाहन मालकांविरूध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि यशवंत जाधव, पोहेकॉ ज्ञानदेव नागरे, नंदू खंदारे, किरण चव्हाण, विजू निकाळजे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करीRevenue Departmentमहसूल विभागPoliceपोलिस