पोलीस दलात खांदेपालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 12:58 AM2019-09-05T00:58:40+5:302019-09-05T00:59:21+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बुधवारी बदल्या केल्या आहेत.

Internal changes in the police force | पोलीस दलात खांदेपालट

पोलीस दलात खांदेपालट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बुधवारी बदल्या केल्या आहेत. यात कदीम पोलीस ठाण्याचा पदभार पोनि डी.के.शेळके यांच्याकडे तर तालुका जालना ठाण्याची सूत्रे पोनि एस.एच.गंदम यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. तर पोलीस अधीक्षकांचे वाचक सपोनि एस.डी.पायघन यांची टेंभुर्णी ठाण्यात बदली झाली आहे.
बाहेरील जिल्ह्यातून बदलून आलेले पोनि डी.के.शेळके यांची कदीम पोलीस ठाणे, पोनि एम.बी.खेडकर यांची बदनापूर ठाणे, पोनि डी.पी.पवार यांची पोलीस अधीक्षकांचे वाचक म्हणून बदली झाली आहे.
तर जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोनि एस.डी.हुंबे यांची परतूर पोलीस ठाणे, परतूर येथील पोनि एस.एच. गंदम यांची तालुका जालना, पोलीस अधीक्षकांचे वाचक सपोनि एस.डी.पायघन यांची टेंभुर्णी, कदीम जालना येथील सपोनि ए.एस.मोरे यांची जाफराबाद पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.
पोलीस अधीक्षकांचे आदेश : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रक्रिया
कदीम पोलीस ठाण्यातील पोनि एस.एम.लोहकरे यांची जिल्हा विशेष शाखेत तर बदनापूर पोलीस ठाण्यातील सपोनि व्ही.सी.राजपूत यांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. चंदनझिरा पोलीस ठाण्यातील सपोनि एस.आर.सिरसाठ यांची अंबड व टेंभुर्णी येथील सपोनि एस.बी. भागवत यांची बदनापूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. अंबड येथील सपोनि बी. के. बलैय्या यांची नियंत्रण कक्षात तर टेंभुर्णी येथील पोउपनि डी.एस.साखळे यांची अंबड येथे बदली झाली आहे.
घनसावंगी येथील पोउपनि ए.एस.बोडखे यांची परतूर, परतूर येथील पोउपनि पी.पी. माने यांची घनसावंगी तर सदर बाजार ठाण्यातील पोउपनि व्ही.आर. जाधव यांची मंठा येथे बदली झाली आहे. मंठा येथील पोउपनि आर.टी.चव्हाण यांची चंदनझिरा तर अंबड येथील पोउपनि एस.डी.शेजूळ यांची टेंभुर्णी ठाण्यात बदली झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बदली प्रक्रिया झाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Internal changes in the police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.