शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

ऑक्टोबरच्या नुकसानीची पाहणी मार्चमध्ये; विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अक्कल गहाण ठेवू नये, कृषिमंत्री दादा भुसे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 13:17 IST

अनेक मुद्यांवरून कृषिमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

जालना : गोपीनाथ मुंडे अपघात विमा, मार्च महिन्यात ऑक्टोबर महिन्यात शेडनेटचे नुकसान झाल्याची तक्रार आल्यावर त्याची पाहणी मार्च महिन्यात करणे यासह अन्य मुद्यांवरून कृषिमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शिल्लक उसाचा प्रश्न गंभीर असल्याचे मान्य करतांना तो पूर्ण गाळप केला जाईल, असे नियोजन शासन स्तरावरून केले जात असल्याची माहिती कृषिमंत्री भुसे यांनी शुक्रवारी येथे आयोजित आढावा बैठकीत दिली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात औरंगाबाद, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांतील खरीप हंगामाचा आढावा घेण्यासाठी मंत्री भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत खरीप हंगाम आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री राजेश टोपे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हा परिषदेचे सीईओ मनूज जिंदल, वरिष्ठ कृषी अधिकारी डी. एल. जाधव, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, विस्तार अधिकारी भीमराव रणदिवे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थित होती.

या बैठकीत तीनही जिल्ह्यांतील खरिपाचे क्षेत्र, पर्जन्यमान, लागणारे बियाणे, खते यांचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, या बैठकीत गोपीनाथ मुंडे अपघात विम्याचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहेत. यावरून भुसे जाम चिडले होते. त्यांनी बैठकीतच विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना उठवून चांगलीच कानउघाडणी केली. तसेच अक्कल गहाण ठेवून कामे न करण्याच्या सूचना दिल्याने बैठकीत एकच खळबळ उडाली. यासह बदनापूर तालुक्यातील एका महिलेने शेडनेट बाबत दिलेल्या तक्रारीवरूनही अधिकाऱ्यांना खडसावले. तसेच संबंधितांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाईचे निर्देश दिले.

शिल्लक उसाचे नियोजनयावेळी शिल्लक उसाचे नियोजन केले असून, शेतकऱ्यांनी धीर न सोडण्याचे आवाहन त्यांनी केले. जालन्यातील सीड्स पार्कचा प्रस्ताव मार्गी लागणार असल्याचे सांगून कापूस, सोयाबीनच्या क्लस्टरसाठी एक हजार कोटींची तरतूद आहे. त्याची अंमलबजावणी या खरीप हंगामापासून केली जाईल, असे सांगितले. ओवा, तुळस आदी पिकांकडेही शेतकरी आता वळत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. हिंगोली जिल्ह्यातील हळद प्रकल्पासह औरंगाबाद जिल्ह्यातील पंतप्रधान अन्न सुरक्षा योजनेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :agricultureशेतीJalanaजालनाFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा