शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या कॉपीबहाद्दरांच्या पथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 01:29 IST

होमगार्डनी टाकलेल्या बहिष्काराचा परीक्षा बंदोबस्तावर परिणाम झाला असून, कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : येथील पोलीस ठाण्यात मंजूर पदापेक्षा कमी कर्मचारी असल्याने बारावीच्या परीक्षा बंदोबस्तावरही याचा परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे होमगार्डनी टाकलेल्या बहिष्काराचा परीक्षा बंदोबस्तावर परिणाम झाला असून, कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट दिसून येत आहे.भोकरदन तालुक्यात ११ परीक्षा केंद्रावर १८ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरू झाली आहे. १८ रोजी इंग्रजी विषयाचा पेपर होता. त्यामुळे काही परीक्षा केंद्रावर पालकासह काही शिक्षक, काही रोडरोमिओंमध्ये परीक्षार्थींना कॉप्या पुरविण्यासाठी चढाओढ दिसून आली. त्यांना लगाम लावण्यासाठी बंदोबस्तावरील पोलीस कर्मचा-याच्या नाकी नऊ आले. परीक्षेच्या काळात प्रत्येक वर्षी सेंटरवर पोलीस कर्मचाऱ्यांसह होमगार्डच्या नियुक्त्या करण्यात येत होत्या. त्यामुळे एका परीक्षा केंद्रावर दोन पोलीस कर्मचारी व तीन- चार होमगार्ड कर्तव्य बजावत होते. मात्र यंदा थकीत वेतनामळे होमगार्डनी या कामावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे परीक्षेचा बंदोबस्त पाहण्याचे काम पोलीस यंत्रणेवर पडले आहे.भोकरदन ठाण्यातील पोलीस कर्मचाºयाची संख्या ही निजाम कालीन आहे. ठाण्याच्या हाद्दीत भोकरदन शहरासह ७६ गावांचा समावेश आहे. जवळपास दीड लाख लोकसंख्येसाठी केवळ ५२ कर्मचारी आहेत. यातील अनेक कर्मचारी विविध कारणांस्तव रजा, सुट्यांवर असतात. त्यामुळे केवळ ३५ कर्मचारीच पोलिस ठाण्यात नियमित हजर राहतात. परिणामी, ठाण्यात किती कर्मचारी ठेवायचे व बंदोबस्तासाठी किती द्यायचे, याचा ताळमेळ लावताना अधिका-यांच्या नाकी नऊ येत आहेत. शिवाय परीक्षा सेंटरमध्ये पेपर गार्डसाठी चार कर्मचारी द्यावे लागले असून, दोन सत्रात ८ कर्मचारी या ठिकाणी अडकले आहेत. खाली केवळ २७ कर्मचारी उरत असून, कोणी सुटीवर तर कोणी रिकमध्ये असल्याने इतर बंदोबस्त करायचा कसा, असाही प्रश्न अधिका-यांसमोर आहे. परीक्षा केंद्रावरच कमी कर्मचारी असल्याने कॉपी पुरविणा-यांची मात्र, चांदी होत असून, काही सेंटरवर कॉप्यांचा धंदा सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान, कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी शिक्षण विभागासह पोलीस प्रशासनाने कॉपी बहाद्दरांवर कारवाई करण्याची गरज आहे.परीक्षा केंद्रावर मोठी गर्दीभोकरदन शहर व तालुक्यातील परीक्षा केंद्राबाहेर कॉप्या पुरविणाºयांची गर्दी होत आहे. शिवाय ज्या शिक्षकांना ड्युटी नाही, ते शिक्षकांसह खाजगी शिकवणी चालकही केंद्राच्या परिसरात घिरट्या मारताना दिसत आहेत. त्यामुळे केंद्रातील बैठे पथक करते काय, असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाPoliceपोलिसStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र