शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वीज मीटरचे रीडिंग घेण्यापूर्वी आता मिळणार एसएमएसव्दारे सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:17 IST

मीटरचे रीडिंग कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येणार आहे याची पूर्वसूचना ग्राहकांच्या महावितरणकडील नोंदणीकृत मोबाईलवर एक दिवस अगोदर एसएमएसद्वारे दिली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर रीडिंग आणि वीजबिलात अचूकता व पारदर्शकता रहावी यासाठी महावितरणच्या ग्राहकांना आता मीटरचे रीडिंग कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येणार आहे याची पूर्वसूचना ग्राहकांच्या महावितरणकडील नोंदणीकृत मोबाईलवर एक दिवस अगोदर एसएमएसद्वारे दिली जाणार आहे.महावितरणने आॅगस्ट २०१६ पासून मोबाईल अ‍ॅपव्दारे मीटर रीडिंग घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वीजबिलात मोठया प्रमाणात अचूकताही आली आहे. आता वीजमीटर रीडिंग प्रक्रियेत ग्राहकांना आपले मीटर रीडिंग तात्काळ तपासता यावे म्हणून महावितरणकडे नोंदणी केलेल्या अधिकृत मोबाईलवर ग्राहकांना मीटर रीडिंगच्या पूर्वसूचनेचा एसएमएस देण्यात येणार असून यात सकाळी ८ ते १०, १० ते १२ दुपारी १२ ते ३ आणि ३ ते ६ या दरम्यान कोणत्या वेळेत रीडिंग घेतले जाणार आहे याची माहिती दिली जाणार आहे. यामुळे ग्राहकांची गैरसोय टळणार असून रीडिंग घेण्याच्या वेळेस ग्राहकांना उपस्थित राहून योग्य रीडिंग घेतले जात आहे अथवा नाही, याची खातरजमा करता येणे शक्य होणार आहे.या नवीन सुविधेतून ग्राहकांच्या मीटर रीडिंग बाबतच्या तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच अनेकवेळा संबंधित कर्मचारी हे वीज मीटर बाहेर असल्याने कधी रीडिंग घेऊन जातात ते कळतही नाही.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण