उपसंपादकासाठी सूचना - संगणकात मास्टरकी मजकुरात नावाचा उल्लेख नाही, तपासणे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:31 AM2021-05-08T04:31:10+5:302021-05-08T04:31:10+5:30

ताण कमी करण्यासाठी खाकीतही जोपासला जातो छंद जालना : गेल्या वर्षभरापासून वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांप्रमाणेच पोलीस दलही रस्त्यावर आहे. कोरोनाचा ...

Instructions for the Deputy Editor - The name is not mentioned in the Masterkey text in the computer, check. | उपसंपादकासाठी सूचना - संगणकात मास्टरकी मजकुरात नावाचा उल्लेख नाही, तपासणे.

उपसंपादकासाठी सूचना - संगणकात मास्टरकी मजकुरात नावाचा उल्लेख नाही, तपासणे.

Next

ताण कमी करण्यासाठी खाकीतही जोपासला जातो छंद

जालना : गेल्या वर्षभरापासून वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांप्रमाणेच पोलीस दलही रस्त्यावर आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी वेळोवेळी लॉकडाऊन अर्थात कडक निर्बंध लागू केले जात आहेत. त्यामुळे पोलीस रस्त्यावर उतरल्याशिवाय गर्दी नियंत्रणात आणणे शक्य नसल्याचे वास्तव आहे. या सततच्या व्यस्ततेवर उपाय म्हणून आरोग्यासह शांतचित्त राहण्यासाठी व्यायाम हा आलाच. परंतु अनेक छंद जोपासूनही काही पोलीस अधिकारी, कर्मचारी आपला ताणतणाव कमी करत असल्याचे दिसून येते. जालना पोलीस दलातही अनेक चांगले कलाकार, खेळाडू, संगणकतज्ज्ञ तसेच कला जोपासणारे कर्मचारी मोठ्या संख्येने आहेत. यातील काही मोजक्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता, छंदातून मन:शांती आणि एक वेगळी ऊर्जा मिळत असल्याचे अनुभव कथन केले.

बॉडी बिल्डिंगला महत्त्व

जालना पोलीस दलातील युवक पोलीस कर्मचारी किशोर डांगे यांना लहानपणापासूनच व्यायामाची गोडी होती. त्याचे रूपांतर त्यांनी चांगले करिअर करण्यात केले. आज किशोर डांगे यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभाग नोंदवून जालन्यासह पोलीस दलाचे नाच उंचावले असल्याचे दिसून आले. यामुळे तणावही हलका होतो.

संगणकात मास्टरकी

वडील पोलीस दलात होते. त्यामुळे आपणही पोलीसमध्ये दाखल झालो. संगणकाची आवड असून, त्यात दोन सुवर्णपदके मिळविली आहेत.

केक बनवण्याला प्राधान्य

वडील पोलीस दलात हाते. त्यामुळे आपल्याला वर्दीचे ॲट्रॅक्शन होते. त्यातून आपण पोलीस दलात रूजू झाल्याचे सध्या एलसीबीत कार्यरत असलेल्या नंदा भट यांनी सांगितले. ताणतणावातून मुक्त होण्यासाठी केक तयार करण्याची आवड होती. ती आजही जोपासली आहे. पोलिसांसह अन्य नागरिकांकडूनही केकला मोठी मागणी असल्याने कर्तव्य बजावून ही आवड आपण जपत आहोत.

भजन, कीर्तनात रंगतो...

पोलीस दल म्हटले की, ताण हा आलाच, परंतु तो दूर करण्यासाठी आपण भजन, कीर्तनात रमतो. यातून आध्यात्मिक आनंद मिळत असल्याचे योगेश गायके यांनी सांगितले.

Web Title: Instructions for the Deputy Editor - The name is not mentioned in the Masterkey text in the computer, check.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.