शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सावरगाव, सोनदेव येथील शेतमजूर कुटुंबावर आस्मानी संकटाचा घाला; दोन्ही गावावर शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 00:26 IST

शेतमजुरांनी पावसापासून बचावासाठी झाडाचा आधार घेतला. मात्र, विजेच्या रूपात आस्मानी संकट कोसळले आणि सावरगाव भागडे, सेवली येथील तिघा शेतमजुरांचा मृत्यू झाला.

सुभाष शेटे ।लोकमत न्यूज नेटवर्कसेवली : शेतातील सोयाबीनची कापणी सुरू असताना अचानक विजांच्या कडकडाटात पाऊस सुरू झाला. शेतमजुरांनी पावसापासून बचावासाठी झाडाचा आधार घेतला. मात्र, विजेच्या रूपात आस्मानी संकट कोसळले आणि सावरगाव भागडे, सेवली येथील तिघा शेतमजुरांचा मृत्यू झाला. या घटनेने दोन्ही गावावर शोककळा पसरली आहे.गयाबाई गजानन नाईकनवरे (३८ रा. सावरगाव भागडे), मंदाबाई नागोराव चाफले (४३), संदीप शंकर पवार (३५ दोघे रा. सेवली ता. जि. जालना) अशी मयतांची नावे आहेत. नाईकनवरे यांच्या शेतात रविवारी दुपारी ही घटना घडली. दुष्काळामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हे शेतमजूर मिळेल तेथे कामाला जाऊन मजुरी करीत होते. मात्र, रविवारी नियतीने घाला घातला आणि कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचे प्राण गेले. सावरगाव भागडे येथील गयाबाई नाईकनवरे यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. तर संदीप पवार यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, वडील असा परिवार आहे. पवार यांचा मुलगा मंगेशही या घटनेत गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर मयत मंदाबाई चाफले यांच्या पश्चात दोन मुलं आहेत.घटनेनंतर सेवली प्राथमिक आरोग्य केंद्रात मयताच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. मयतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, सेवली येथील मयत मंदाबाई चाफले यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, तालुक्यातील माळ सोनदेव शिवारातही वीज पडली. या घटनेत मंगल बद्रीनाथ पालवे (२३), शबानाबी शेख गुलाब (३०) व सुहाना शेख (१६) या तीन महिला मजूर जखमी झाल्या. मंगल पालवे, शबानाबी शेख यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तर सुहाना शेख यांना उपचारासाठी सिंदखेडराजा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा रूग्णालयात उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी दिली.

टॅग्स :RainपाऊसDeathमृत्यू