शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेची वाढीव कर आकारणी; पाच दिवस चालणार तक्रारींची सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 00:35 IST

जालना पालिकेने गेल्यावर्षी मालमत्ताकर आणि पाणीपट्टीत मोठी वाढ केली आहे. ही वाढ मंजूर नसणाऱ्या जवळपास अडीच हजार नागरिकांनी या कर वाढीवर आक्षेप घेतले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना पालिकेने गेल्यावर्षी मालमत्ताकर आणि पाणीपट्टीत मोठी वाढ केली आहे. ही वाढ मंजूर नसणाऱ्या जवळपास अडीच हजार नागरिकांनी या कर वाढीवर आक्षेप घेतले होते. या आक्षेपांची एक सुनावणी यापूर्वीच झाली. परंतु त्यातून काही हाती आले नाही. त्यामुळे आता दुसऱ्यांदा यावर सुनावणी घेऊन नागरिकांचे म्हणणे जाणून घेऊन त्यावर निर्णय अपेक्षित आहे.जालना पालिकेने गेल्यावर्षी मालमत्ताकर तसेच पाणीपट्टीत मोठी वाढ केली होती. ही वाढ करतांना पालिकेने एका खासगी कंपनीकडून जालन्यातील मालमत्ता कराचे सर्वेक्षण करून घेतले होते. त्या एजंसीने दिलेल्या आधारावर कारपेट एरिया निश्चित करून हा वाढीव कर जालन्यातील नागरिकांना लागू केला होता. यात साधारपणे दोन हजार ८०० रूपये मालमत्ता कर तस एक हजार ५०० ते एक हजार ८०० रूपये अशी पाणीपट्टीची आकारणी केली आहे. या दोन्ही वाढीवर नागरिकांनी तीव्र आक्षेप घेत सुनावणी घेण्याची मागणी जिल्हाधिका-यांकडे केली होती. गेल्यावर्षी निवडणुका असल्याने हा मुद्दा शिवसेनेने मोठ्या प्रमाणावर उचलूनही धरला होता. परंतु आता शिवसेना राज्याच्या सत्तेत असल्याने आता त्यांची या महत्वाच्या प्रकरणात कुठली भूमिका राहते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जालना पालिकेला हक्काचा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणजेच शहरातील मालमत्ता करासह पाणीपट्टीतून येणारा महसूल हाच असतो. पालिकेला विकास कामे करण्यासाठी विविविध योजनांव्दारे निधी मिळत असतो. परंतु जो रोखीने मिळणारा निधी असतो तो या दोन्हींच्या कर आकारणीतूनच उपलब्ध होतो. ज्या खासगी एजंजीकडून हे सर्वेक्षण करून घेण्यात आाले, त्यांनी अनेकांचे सर्वेक्षण चुकीचे केल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे या सुनावणीकडे आक्षेप दाखल केलेल्या नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत. दरम्यान सत्ताधा-यांकडून या करवाढीचे समर्थन केले जात आहे. ही करवाढ दहा ते बारा वर्षानंतर करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.जालना शहरातील वाढीव मालमत्ता तसेच पाणीपट्टीत जी वाढ केली होती. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतले. परंतु ज्या नागरिकांनी आक्षेप घेतले नाहीत, अशांचे यात नुकसान झाले आहे. त्यातील अनेकांनी वाढीव कर पालिकेकडे भरला आहे.दरम्यान सोमवारपासून सुरू होणा-या या सुनावणीसाठी जिल्हाधिकाºयांचे प्रतिनिधी म्हणून जालन्याचे उपविभागीय अधिकारी केशव नेटके, विशेष अधिकारी म्हणून नगररचना विभागाचे औरंगाबाद येथील वरिष्ठ अधिकारी खरवडकर, उपनगराध्यक्ष राजेश राऊत तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या सभापतींचा त्यात समावेश आहे.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदTaxकर