शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

भाजप १८ - महाविकास आघाडी 0; रावसाहेब दानवेंच्या भोकरदनमध्ये भाजपचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 17:42 IST

आज १६ जागांसाठी मतमोजणी करण्यात आली, दोन जागा बिनविरोध निवडून आल्या

- फकिरा देशमुखभोकरदन (जालना) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाने १८ पैकी १८ जागा जिंकून बाजार समिती परत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीला भोपळा मिळाला आहे. महाविकास आघाडीला एकही संचालक निवडून आणता आला नसल्याने त्यांचा या ठिकाणी मोठा पराभव मानण्यात येत आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी रविवारी  दि.२५ डिसेंबर रोजी मतदान झाले. भोकरदन तालुक्यातील सहा गावांतील १३ मतदान केंद्रांवर मतदान झाले या निवडणुकीसाठी २ हजार ८२४ मतदार पैकी २ हजार ५८४ मतदारांनी हक्क बजावला होता.भोकरदन बाजार समितीच्या निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेभाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांच्या नेतृत्वाखाली राजुरेश्वर शेतकरी विकास पॅनल तर माजी आ. चंद्रकांत दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनल आमने-सामने निवडणुकीच्या मैदानात होते.

१८ पैकी दोन जागांवर यापूर्वीच भारतीय जनता पक्षाचे दोन संचालक बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित १६ जागांवर देखील झालेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारत महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत चंद्रकांत दानवे यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या आघाडीच्या शिवसेना, काँग्रेस च्या नेत्यांना  एकही संचालक निवडून आणता आला नसल्याने परत बाजार समितीवर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. 

विजय झालेल्या सर्व उमेदवारांचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, निर्मलाताई यांनी त्यांच्या निवासस्थानी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने विजयी उमेदवार व त्यांचे समर्थक दिसून आले. ढोल ताशांच्या गजरात विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत भाजपा तालुका अध्यक्ष राजेंद्र देशमुख, सभापती कोतिकराव जगताप, आशाताई पांडे, समाधान शेरकर, डाक्टर चंद्रकांत साबळे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनेक वर्षांपासून भाजपची सत्ताभोकरदन-जाफ्राबाद कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना स.न. १९७२ ला झाली. सुरुवातीची काही वर्षे सोडली तर सलग साधारण ३० वर्षांपासून या बाजार समितीवर भाजपाची सत्ता कायम आहे. आणि आता परत प्रचंड बहुमताने विजय मिळवत बाजार समितीवर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व आमदार संतोष दानवे यांनी बाजार समितीवरील आपली सत्ता कायम ठेवली आहे. त्यानंतर (ता.२८) ऑगस्ट २००८ ला जाफ्राबादची बाजार समिती स्वतंत्र करण्यात आली. 

सोळा संचालकांमधून निवडून आलेले उमेदवार ग्रामपंचायत मतदार संघ:- आनंदाबाई रामराव ढाकणे,(843)यशोदाबाई लक्ष्मण मळेकर, (838)अनिल शेषराव राऊत,सुमनबाई कडुबा शेरकर, (874) ग्रामपंचत अनुसूचित जाती/जमाती:- टिकाराम धनसिंग मिमरोट, (632) ग्रामपंचत सर्वसाधारण मतदार संघ:-नंदकुमार लक्ष्मण गिर्हे ,(661)कल्पना संजय काकडे, (638)व्यापारी मतदार संघ :-सुभाष भिकनराव देशमुख,(334)सुभाष सांडु जंजाळ (333)

सहकारी संस्था मतदार संघ: बालाजी रामभाऊ औटी,(822)अर्चना मुकेश चिने, (820)कौतिकराव नामदेव जगताप,(828)प्रमोद प्रभाकर कुलकर्णी,(916)मगनराव काशिराम मुगटराव,(778)अलका भागवत पोटे,(767)नजीर महमद ईलीयास शेख(751) शिंदे गट तर हमाली मापाडी मतदार संघातून सोनाजी गणपत दानवे (बिनविरोध), व सहकारी संस्था(वी,जा/भ, ज/वी.मा. प्र) मतदार संघातून रामलाल चव्हाण (बिनविरोध) हे निवडून आले आहेत यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक संजय भोईटे पी बी वरखडे, परेश बेरा, बी आर गिरी, आर आर गिराम, बी आर काकडे यांनी या निवडणुकीसाठी काम पाहिले.

टॅग्स :JalanaजालनाBJPभाजपाraosaheb danveरावसाहेब दानवे