शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

दावा ठाकरेंचा, उमेदवार पवारांचा; जालन्यात मविआच्या दोन तर महायुतीच्या एका जागेवर तिढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 16:25 IST

जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघ आपल्याकडेच राहावेत, यासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला होता.

जालना : जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांची रणधुमाळी दिवसेंदिवस चांगलीच पेटू लागली आहे. महायुतीत भाजपकडून तीन, शिंदेसेनेकडून एका जागेवरील उमेदवार घोषित करण्यात आला आहे, तर घनसावंगीतील उमेदवार अद्याप घोषित झालेला नाही. या ठिकाणी तिन्ही मित्रपक्षांनी दावा केला आहे. दुसरीकडे मविआतील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीत भोकरदन, बदनापूर आणि घनसावंगीतील उमेदवारांची घोषणा झाली. विशेष म्हणजे बदनापूरवर उद्धवसेनेचा दावा असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाने ही जागा खेचली आहे.

जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघ आपल्याकडेच राहावेत, यासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला होता. महायुतीकडून भाजपने भोकरदन, बदनापूर आणि परतूर हे तीन विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यात यश मिळविले, तर शिंदेसेनेला जालना विधानसभा मतदारसंघ सुटला आहे. घनसावंगीत हिकमत उढाण यांनी सीएम शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केल्याने ही जागा शिंदेसेनेकडे जाईल, असा दावा केला जात होता. परंतु, दोन दिवसांपासून घनसावंगीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जोर लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे अपक्ष तयारी केलेले भाजपचे नेते सतीश घाटगे उमेदवारीसाठी प्रयत्नशील असून, ते मुंबईत गेल्याची चर्चा रंगली आहे. या चर्चेमुळे उढाण यांनीही मुंबई गाठली आहे. विशेष म्हणजे भाजपनेही या जागेवर दावा सांगितला होता. महायुतीत भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटापैकी ही जागा कोणाकडे जाते हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मविआकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जिल्ह्यातील तीन जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत. उद्धवसेनेचा दावा असलेला बदनापूर मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेला असून, येथून रूपकुमार चौधरी यांना उमेदवारी मिळाली आहे. घनसावंगी मतदारसंघातून आ. राजेश टोपे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून, भोकरदनमध्ये चंद्रकांत दानवे यांना उमेदवारी मिळाली आहे. मविआतील मित्रपक्ष उद्धवसेनेचा जिल्ह्यातील पाचही जागांवर दावा होता. विशेषत: बदनापूर, जालना, घनसावंगी (अंबड) येथे उध्दवसेनेचे आमदार राहिलेले आहेत. परंतु, भोकरदन, बदनापूर आणि घनसावंगी शरद पवार गटाकडे गेले आहे. जालन्यात काँग्रेसकडून आ. कैलास गोरंट्याल यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे परतूर कोणत्या पक्षाकडे जाते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

परतूरमध्ये होणार कायपरतूरमध्येही काँग्रेसकडून माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया हे दावेदार असून, त्यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. उद्धवसेनेकडून जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांनी उमेदवारी अर्जही भरला आहे. त्यामुळे उद्धव सेनेकडे परतूर विधानसभा मतदारसंघ गेला, तर काँग्रेसकडे जालन्याची जागा राहणार आहे. त्यामुळे मविआत उद्धवसेना आणि काँग्रेसला जिल्ह्यात प्रत्येकी एकच जागा मिळणार आहे. तशीच स्थिती शिंदेसेना आणि अजित पवार गटाची होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकbadnapur-acबदनापूरjalna-acजालनाpartur-acपरतूरbhokar-acभोकरghansawangi-acघनसावंगी