शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जुना वाद उकरून काढला; तरुणास गरम रॉडचे चटके देऊन जीवघेण्या यातना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 12:46 IST

मनसुन्न करणाऱ्या या प्रकरणामुळे भोकरदन तालुक्यात मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता होती का अशी चर्चा सुरू झाली आहे.

भोकरदन ( जालना) : भोकरदन तालुक्यातील जानेफळ गायकवाड येथे जुन्या वादाच्या कारणावरून  कैलास गोविंदा बोराडे ( 33 रा. अनवा)  या तरुणास गरम लोखंडी रॉडने अंगाला चटके देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात शिवसेना उबाठा गटाचे तालुका प्रमुख नवनाथ दौंड व त्यांचा भाऊ सोनू उर्फ भागवत सुदाम दौंड ( रा. जानेफळ गायकवाड ता. भोकरदन )  यांच्यावर पारध पोलिस ठाण्यात गुरुवारी ( दि 27 ) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसुन्न करणाऱ्या या प्रकरणामुळे भोकरदन तालुक्यात मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता होती का अशी चर्चा सुरू झाली आहे.

कैलास बोराडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दौंड आणि त्यांचे शेत शेजारी आहे. त्यामुळे नवनाथ दौंड व त्यांच्यात पूर्वीपासून भांडण आहेत. तेव्हापासून दौंड बंधू माझ्यावर खार खाऊन आहेत. बुधवारी मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर सोनू उर्फ भागवत दौंड याने तू माझ्या भावासोबत भांडण केले होते. तुला मस्ती आली आहे, असे म्हणून मारहाण केली. चुलीवर लोखंडी रॉड तापवून माझ्या पूर्ण शरीराला गरम चटके दिले. यावेळी मी आरडा ओरडा केला तेव्हा कृष्णा चित्ते, माळी, व गोविंद सपकाळ यांनी मला त्यांच्या तावडीतून सोडविले. अन्यथा माझा खून झाला असता. हा धक्कादायक प्रकार ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख नवनाथ दौंड यांच्या सांगण्यावरून करण्यात आला असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. दरम्यान, या प्रकरणात पारध पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा नवनाथ दौंड, सोनू उर्फ भागवत दौंड यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने, उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने करत आहेत.

संपूर्ण शरीरावर दिले जीवघेणे चटकेकैलास गोविंदा बोराडे ( ३६ रा अनवा ता भोकरदन ) हे  बुधवारी ( दि. 26 ) नऊ वाजेच्या दरम्यान कार्ला ते जानेफळ रस्त्यावरील वटेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी सोनू ऊर्फ भागवत सुदाम दौंड ( रा. जानेफळ गायकवाड) याने मंदिरात महिला दर्शन घेत आहेत, तू दर्शनासाठी मंदिरात जाऊ नको, असे म्हणत कैलास यास अडवले. त्यानंतर जुन्या वाद उकरून काढत  तू माझ्या भावासोबत भांडण केले होते. तुला मस्ती आली आहे, असे म्हणून मारहाण सुरू केली. एवढ्यावरच न थांबता सोनू याने लोखंडी रॉड गरम करून कैलास यांच्या पायाला, पोटाला, मानेवर, हाताच्या तळव्यावर, पार्श्वभागावर चटके दिले. जीवघेणे चटक्याने कैलास गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी