शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जैवविविधतेतील महत्वाचा दुवा; जालन्यात आढळली दुर्मीळ ‘जिको रॉक डेक्कनसीस’ पाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 18:38 IST

अन्न साखळीचा हा महत्त्वाचा घटक असून, या पालीचा नैसर्गिक अधिवास हा झाडांवर आहे.

आव्हाना (जि. जालना) : भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथे ‘‘जिको रॉक डेक्कनसीस’’ ही दुर्मीळ पाल आढळली आहे. जैवविविधतेचे अभ्यासक डॉ. संतोष पाटील यांनी या पालीच्या दुर्मीळ प्रजातीची नोंद केली आहे. 

आव्हाना गावातील शेतकरी डॉ. श्रीकांत गावंडे यांच्या शेतात ही पाल आढळून आली. झूलॉजिकल सर्व्ह ऑफ इंडियाने या पालीची नोंद घेतली असून, ग्रामपंचायतीच्या जैवविविधता रजिस्टरमध्ये या पालीची नोंद ग्रामसेवकांनी घेतली आहे. जालना-औरंगाबाद विभागात प्रथमच अशा दुर्मीळ पालीची नोंद झाली आहे. या पालीची लांबी ५ इंच असून, नव्याने आलेली २ इंच लांबीची फिकट गुलाबी शेपटी आहे. पाठीवर खवले व फिकट गुलाबी रंग व त्यावर २ समांतर पांढऱ्या रेषांचे पट्टे आहेत. आडव्या पट्ट्यांवर अधून मधून हिरवे ठिपके; तर मानेवरची त्वचा तपकिरी रंगाची आहे.

अन्न साखळीचा हा महत्त्वाचा घटक असून, नैसर्गिक अधिवास हा झाडांवर आहे. तसेच गवत, खडकाळ भाग आदी ठिकाणीही तिचा रहिवास असतो. पश्चिम घाट, कोकण, सह्याद्रीची पठारे विशेषतः दख्खन भागात ही पाल आढळत असल्याने तिच्या नावात ‘‘डेक्कन’’ शब्द येतो. अशी माहिती जैवविविधता अभ्यासक डॉ. संतोष पाटील यांनी दिली आहे. या नोंदीचा अभ्यासकांना संदर्भ म्हणून उपयोग होईल. कीटक, लहान फळं व फुलं हे या पालीचे अन्न आहे. ही प्रजात अनेक सापांचे भक्ष्य आहे. देशात पालीच्या विविध प्रजातींच्या साडेतीनशेहून अधिक प्रजातींची नोंद आहे. यापूर्वी राज्यात रायगड जिल्ह्यातील फणसाड व सातारा येथे ही पाल आढळल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

नैसर्गिकरीत्या कीड नियंत्रकसरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल भीती व घृणा असल्याने नवीन प्रजाती दिसल्यास हानिकारक असावी, या गैरसमजुतीने तिच्या हत्या होतात. कीटकनाशके अशा सरीसृप कीटकांना मारक ठरत आहेत. वाढते तापमानही यास घातक ठरते. ही ‘जिको’ कीटकभक्षी असल्याने नैसर्गिकरीत्या कीड नियंत्रण करते. त्याचा शेतकऱ्यांना फायदाच होतो.- डॉ. संतोष पाटील, जैवविविधता अभ्यासक, अभिनव प्रतिष्ठान, सिल्लोड

टॅग्स :Jalanaजालनाforestजंगलagricultureशेती