शहराच्या विकासात अमर, अकबर, ॲन्थोनीच गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:32 AM2021-08-23T04:32:15+5:302021-08-23T04:32:15+5:30

दुसरीकडे राजेश टोपे यांनी यावेळी अत्यंत सावध भूमिका घेत नेहमीप्रमाणे संयमी भाषण केले. त्यांनी शहराच्या विकासासाठी पक्षभेद बाजूला ठेवून ...

Immortal, Akbar, Anthony are needed in the development of the city | शहराच्या विकासात अमर, अकबर, ॲन्थोनीच गरजेचे

शहराच्या विकासात अमर, अकबर, ॲन्थोनीच गरजेचे

Next

दुसरीकडे राजेश टोपे यांनी यावेळी अत्यंत सावध भूमिका घेत नेहमीप्रमाणे संयमी भाषण केले. त्यांनी शहराच्या विकासासाठी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्रित काम करण्याची गरज व्यक्त केली. राज्य सरकारकडून शहराच्या विकासासाठी हवी ती मदत आपण याआधीदेखील केली असून, भविष्यातही ती करू, असे सांगितले; परंतु त्यांनी महापालिकेचा मुद्दा उपस्थित करून एक प्रकारे आमदार गोरंट्याल यांना डिवचले. याच मुद्द्यावरून सहा महिन्यांपूर्वी नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे हे जालन्यात आले असताना माजी मंत्री अर्जुन खोतकरांनी जालना पालिकेचे रूपांतर महापालिकेत करण्याचा मुद्दा मांडला होता. त्यावेळी देखील आ. गोरंट्याल यांनी त्याला प्रखर विरोध दर्शविला होता. त्यामुळे टोपेंच्या आजच्या वक्तव्याकडे गोरंट्याल हे कसे पाहतात हे दिसून येणार आहे. रेल्वेच्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी आपल्यावर जेवढे वार करण्याचे प्रयत्न होतात तेवढे आपण सक्षम होत असून, त्यातून आपली दिवसेंदिवस प्रगतीच होत असल्याचे सांगून पुलाच्या मुद्द्यावरून बाप काढण्याचा जो प्रकार मध्यंतरी केला गेला तो निंदणीय असल्याचे सांगून हा संस्काराचा भाग नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, आपण सलग पाववेळा जनतेच्या प्रेमामुळेच विजयी झालो असून, आता सहाव्यांदाही एकदा लोकसभेची परीक्षा म्हणजेच लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगून आपण आजही मैदान सोडले नसल्याचे त्यातून दाखवून दिले.

मेडिकल कॉलेज आणणारच

रेल्वेस्थानक येथे झालेल्या आपल्या भाषणात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १०३ कोटी रुपयांचे मनोरुग्णालय जालन्यात होणार आहे. त्याचा लाभ हा मराठवाड्यासह विदर्भातील जिल्ह्यांना होणार आहे. या रुग्णालयामुळे जवळपास २५० डॉक्टर येथे रुजू होणार आहेत. दरम्यान, मेडिकल कॉलेज अर्थात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देखील जालन्यात आणणार असल्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केला. त्यात केवळ ते पीपीई तत्त्वावर की, संपूर्ण शासकीय यावर चर्चा सरू असून, यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचीही मदत लागेल, असे सांगितले.

Web Title: Immortal, Akbar, Anthony are needed in the development of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.