शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना स्फोटके; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:07 IST

सोयगाव देवी शिवारात विनापरवाना स्फोटके बाळगल्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून ६ लाख १३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून एकाला अटक करून त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील सोयगाव देवी शिवारात विनापरवाना स्फोटके बाळगल्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून ६ लाख १३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून एकाला अटक करून त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे़स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी विनोद गडदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ३१ मे रोजी सोयगाव देवी मंदिराच्या शिवारामध्ये एक इसम विनापरवाना स्फोटके बाळगुन विहिरीमध्ये बार उडवित असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यावरून पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हनुमंत वारे, गोकुळ कायटे, विनोद गडदे, समाधान तेलंग्रे, विष्णू कोरडे, विलास चेके, ईश्वर भिसे यांनी या ठिकाणी २ वाजेच्या दरम्यान छापा मारला असता शिवनाथ कौतिकराव राऊत (रा़ सोयगाव देवी) हा ट्रॅक्टर (क्र. एम.एच. २१ सी ८८४२) वर कॉप्रेशर, व स्फोटके त्यामध्ये २१९ स्फोटक पिना व २८६ तोटे घेऊन आढळला.या बाबत परवाना आहे काय यांची विचारणा केली असता त्याच्याकडे परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याच्या विरूध्द भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस