शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

जालन्यातील बड्या रुग्णालयांचे आरोग्य विभागाच्या नियमांकडे दुर्लक्ष  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 13:52 IST

शहरी भागातील बहुतांश बड्या रुग्णालयांमध्ये आरोग्य विभागाच्या नियमांचे पालन केले जाते नसल्याचा प्रकार तपासणीत समोर आला आहे.

ठळक मुद्दे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या माध्यमातून जालना शहरासह तालुका पातळीवरील सर्वच खाजगी रुग्णालयांची तपासणी सुरु अशा रुग्णालयांना जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत ४८ तासात खुलासा सादर करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या

जालना : शहरी भागातील बहुतांश बड्या रुग्णालयांमध्ये आरोग्य विभागाच्या नियमांचे पालन केले जाते नसल्याचा प्रकार तपासणीत समोर आला आहे. अशा रुग्णालयांना जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत ४८ तासात खुलासा सादर करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

शहरात लहान-मोठी २०० हून अधिक रुग्णालये आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या माध्यमातून जालना शहरासह तालुका पातळीवरील सर्वच खजगी रुग्णालयांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मागील तीन आठवड्यांपासून  १२ पथकांच्या माध्यमातून सुरू असलेल्या या तपासणीमध्ये रुग्णालयात प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसणे, परवानगी नसताना अधिक रुग्णांना भरती करणे, कुठलीही पूर्वनोंदणी न करताना रुग्णालय थाटून उपचार करणे, बायो मेडिकल वेस्टजची योग्य विल्हेवाट न लावणे, अधिकची फी आकारणे, उपचारानंतर पक्के बिल न देणे,  रुग्णालय संलग्न मेडिकल दुकानांना परवाना नसणे, रुग्णालयात सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना नसणे आदी गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. शहरातील काही मोठ्या रुग्णालयांचाही यात समावेश आहे. विशेषत: भोकरदन तालुक्यातील काही खाजगी रुग्णालयांमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. 

बीएएमएस व बीएचएमएस डॉक्टरांच्या रुग्णालयांमध्येही अनेक त्रुटी आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले.  त्रुटी आढळून आलेल्या सुमारे २२ हून अधिक  रुग्णालयांना जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. संबंधित रुग्णालयांनी ४८ तासात समाधानकारक स्पष्टीकरण देवून त्रुटी दूर न केल्यास त्यांची परवानगी रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले.

सोनोग्रॉफी सेंटरचीही तपासणीपीसीपीएनडीटी कायद्याच्या काटेकोर अमलबजावणीसाठी जिल्ह्यातील   सोनोग्रॉफी सेंटरचीही नियमित तपासणी करण्यात येत असल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले. प्रत्येक तीन महिन्याला सोनोग्रॉफीशी संबंधी आवश्यक सर्व कागदपत्रांची तपासणी केली जात असल्याने बहुतांश सेंटरमध्ये नियमांचे पालन केले जात असल्याचे तपासणीत समोर आल्याचे ते डॉ. राठोड म्हणाले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरzpजिल्हा परिषद