शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सरकार आल्यास शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीला प्राधान्य देणार- उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 00:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : शेतकरी कर्जमुक्त आणि चिंतामुक्त कसा होईल, यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे. पीकविमा मिळावा म्हणून ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकरी कर्जमुक्त आणि चिंतामुक्त कसा होईल, यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे. पीकविमा मिळावा म्हणून मोर्चे काढले. त्यामुळे एक हजार कोटी रूपये विमा कंपन्यांना देण्या भाग पाडले. दरम्यान १५ वर्षे काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना वेगवेगळ््या योजनांमध्ये गैरव्यवहार करून ते आता थकले असल्याची टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी घनसावंगी येथील प्रचार सभेत बोलताना केली.घनसावंगी येथील शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांच्या प्रचारासाठी ठाकरे गुरूवारी घनसावंगी दौ-यावर आले होते. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, जे आम्ही बोलतो ते करून दाखवितो. केवळ भूलथापा मारणे हा आमचा बाणा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींना सोबत घेऊन जे स्वराज्य स्थापन केले होते त्या पावलावर आम्ही मार्गक्रमण करत आहोत. समाजातील वंचित घटकांना त्यांच्या विकास आणि हकांपासून दूर कोणी ठेवले, हे सर्वांना माहीत आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करताना १० रूपयांत पोटभर जेवण आणि १ रूपयामध्ये आरोग्य तपासणी करणार आहोत.धनगर समाजाने त्यांच्या विविध मागण्यांसाठी एकत्रित लढा उभारला आहे. त्याला आमची भक्कम साथ असून, धनगरांनी त्यांच्या काठीला तलवारीची धार आणावी, अशी सूचनाही त्यांनी केली. शिवसैनिकां समोर गुडघेच काय; परंतु डोकेही आपण टेकवू, असे सांगताना ठाकरे हे भावनिक झाले होते. यावेळी माजी आ. विलास खरात यांनीही सविस्तर मार्गदर्शन केले. दरम्यान या मतदारसंघात आजही अनेक प्रश्न कायम असल्याचे सांगण्यात आले. मतदार आता जागृत झाला असून, त्यांना भूलथापा देऊन वळवण्याचे जे प्रकार पूर्वी होत होते, ते आता होणार नाहीत, असेही खरात यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019ghansawangi-acघनसावंगी