शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यास यंत्रणांवरील दबाव १०० टक्के कमी होईल; देशमुखांनीही मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 13:54 IST

Santosh Deshmukh Murder Case: पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Beed Murder Case: "उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. पुरावे असल्यामुळेच चर्चा करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्‍यांची वेळ मागितली असेल. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यास १०० टक्के यंत्रणांवरचा दबाव कमी होईल. कारण मागच्या १० दिवसांत अनेक घडामोडी घडल्या आहेत. काही व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्डिंग बाहेर आल्या आहेत. त्याची गांभीर्याने दखल घेतली जाणे गरजेचे आहे. त्यामुळे राजीनामा झाल्यास यंत्रणांवरील दबाव नक्कीच कमी होईल," अशी भूमिका मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मांडली आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. अंजली दमानिया यांनी पुरावे दिले आहेत. आपली न्यायाची मागणी आहे. क्रूरकर्मी लोकांनी जी हत्या केली आहे, त्याबाबत न्याय मिळावा, अशी आपली मागणी आहे. तशा यंत्रणा मुख्यमंत्री साहेबांनी राबवल्या आहेत. अटक केलेल्या आरोपींना आणि फरार असलेल्या एका आरोपीला अटक करून सर्वांना फाशीची शिक्षा व्हावी, यावर सर्वजण ठाम आहेत," असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, धनंजय देशमुख हे जालना इथं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणातही सहभागी झाले आहेत. "सरकारने मनोजदादांच्या उपोषणाची गंभीर दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात," असं देशमुख यांनी म्हटलं आहे.

दमानिया-अजित पवार भेटीत काय घडलं?

अंजली दमानिया यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री व अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. या हत्येशी संबंधित आरोपी आणि अन्य लोकांच्या कथित सहभागाविषयीची कागदपत्रे तसेच अन्य पुरावे त्यांनी या भेटीत अजित पवार यांच्याकडे सुपुर्द केले. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बीड व धनंजय मुंडे यांच्यासंदर्भात अजित पवार यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात सातत्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत. दमानिया यांनीही या प्रकरणात मुंडे यांनाच लक्ष्य केले आहे. त्यामुळे दमानिया यांच्या या भेटीनंतर मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल, अशी जोरदार चर्चा आहे. मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात या विषयावर चर्चा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडMaharashtraमहाराष्ट्रanjali damaniaअंजली दमानिया