शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान पेरणारा जालन्याचा अवलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 23:58 IST

विद्यार्थ्यांसह शिक्षकांना विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी शहरातील एका अवलियाने पुढाकार घेतला आहे. संजय टिकारिया असे या अवलियाचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाविज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी शहरातील एका अवलियाने पुढाकार घेतला आहे. संजय टिकारिया असे या अवलियाचे नाव असून, त्यांनी आजवर देशभरात सरासरी एक लाख विद्यार्थी व शिक्षकांमध्येविज्ञानाची गोडी निर्माण करण्याचे काम केले आहे.‘चला आपणच प्रयोग करू’ ही संकल्पना टिकारिया यांची आहे. साध्या टाकाऊ वस्तूपासून प्रयोग करणे, घरगुती साहित्यातून शालेय प्रयोग तयार करणे, यातून विद्यार्थ्यांना अवघड वाटणार विज्ञान विषय सोपा करून दाखविण्याची कसब टिकारिया वापरतात. ते शहरातील सीटीएमके शाळेत प्रयोगशाळा सहायक म्हणून कार्यरत आहेत. घरगुती साहित्यातून शालेय प्रयोग कसे तयार करावेत, याविषयी ते नेहमी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. कमी खर्चामध्ये शाळेत लॅब उभारणे यासाठी टिकारिया नेहमी विविध शाळांमध्ये मार्गदर्शन करतात. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एखाद्या शाळेने त्यांना निमंत्रित करताच ते स्वखर्चाने जातात. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. याचे कोणतेही मानधन घेत नसल्याचेही त्यांनी सांगितले.दहा ते एकरा वर्षांपूर्वी टिकारिया सिंगापूर अभ्यास दौऱ्यावर गेले होते. तेथे त्यांनी ३०० ते ५०० रुपयांमधून बनविलेल्या ‘माझी छोटीशी प्रयोगशाळा’ या पेटीतील त्यांची संकल्पना उपस्थितांना सांगितली. त्यांची ही संकल्पना सर्वांनाच भावली. यानंतर परदेशातील ही शिक्षकांनी ती पेटी तयार केली.प्रयोगशाळा सहायकपदीसंजय टिकारिया मूळचे जालना शहराचेच. त्यांचे वडील सीटीएमके विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या संजय यांनी जालन्यातच एक किराणा दुकान सुरू केले. परंतु, काही कारणात्सव त्यांच्या कुटुंबाला १९८७ साली चिखली येथे स्थलांतरित व्हावे लागले. मात्र, काही दिवसांमध्येच पुन्हा दिवस फिरले आणि टिकारिया कुटुंब १९९१ मध्ये पुन्हा जालन्यात आले. १९९२ मध्ये सीटीएमके विद्यालयात प्रयोगशाळा सहायकपदी संजय टिकारिया यांची नियुक्ती झाली.

टॅग्स :scienceविज्ञानTeacherशिक्षकSchoolशाळा