शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 14:38 IST

दसरा मेळाव्यात मोठा निर्णय घेणार! नारायणगडावर येण्याचे जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन

- पवन पवारवडीगोद्री (जालना): मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारचे कौतुक करतानाच, धोका दिल्यास सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. विखे पाटील चांगले काम करत आहेत आणि मराठ्यांच्या हितासाठी जो मंत्री झटून काम करेल, त्याच्यासाठी मराठा समाज कायम उभा राहील, असेही ते म्हणाले.

आज होणाऱ्या मराठा उपसमितीच्या बैठकीबद्दल माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. "एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब चांगले काम करत आहेत. पण, आम्हाला धोका दिल्यास आम्ही सोडणार नाही, हे तितकेच खरे आहे," असे ते म्हणाले.

मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्याजरांगे पाटील म्हणाले की, मराठवाड्यातील सर्व मराठा कुणबी आहेत. त्यामुळे सर्वांना कुणबी प्रमाणपत्रे मिळाली पाहिजेत. "तुम्ही फक्त प्रक्रिया सुरू करा, आम्हाला काही अडचण नाही. हैदराबाद गॅझेटिअर स्पष्ट सांगते की, मराठवाड्यातील मराठा कुणबी आहे. एकदा प्रमाणपत्रे येणे सुरू झाली की ती अखंडितपणे सुरूच ठेवा, मध्येच थांबू नका," अशी मागणी त्यांनी केली. विखे पाटील यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत ते म्हणाले की, विखे पाटील यांचा समाज नक्कीच आभारी राहील, पण एकही मराठा सुटता कामा नये.

भुजबळांवर जोरदार टीकाजरांगे पाटील यांनी ओबीसी उपसमितीच्या बैठकीवर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. "ती उपसमिती जातीवाद करण्यासाठी नसावी अशी आमची अपेक्षा आहे. ओबीसी उपसमितीच्या बैठकीत मराठ्यांचा एकही मंत्री नाही, हे विचार करण्यासारखे आहे. सरकारने यावर लक्ष द्यावे," असे ते म्हणाले. भुजबळ सरकार आणि मराठा समाजात वितुष्ट निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. "येवल्यावाला नासक आहे, जर माझ्या नादी लागला तर त्याचा सर्व देवारा उठवीन," अशा कठोर शब्दांत त्यांनी भुजबळ यांना आव्हान दिले.

मराठवाड्यातील मराठ्यांचे कल्याण होईलजीआरमध्ये बदल केल्यास महाराष्ट्र पुन्हा उसळेल, असा इशारा देताना जरांगे पाटील म्हणाले, "जीआरला धक्का लावण्याचा प्रयत्न करू नका. सरकारनेच काही लोकांकडून जीआरबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. जर जीआरमध्ये काही चूक झाली असेल, तर तो सुधारित करून मराठवाड्यातील मराठ्यांचे कल्याण होईल."

नारायणगडावर ताकदीने यापुढे बोलताना त्यांनी मराठा समाजाला नारायणगडावरील दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्याचे आवाहन केले. "आम्ही दसरा मेळाव्यात मोठा निर्णय घेणार आहोत. नारायणगडावर मराठेच मराठे दिसले पाहिजेत, ताकदीने या," असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालना