शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 12:52 IST

लातूर जिल्ह्यात ओबीसी तरुणाने जीवन संपविल्याचा घटनेवर मनोज जरांगे पाटील भावूक

- पवन पवारवडीगोद्री (जालना): "मी जरी अशिक्षित असलो तरी तुम्हाला रडकुंडीला आणले. तुला मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे नव्हते, पण त्या विचारांवर मी पाणी फिरवले," अशा शब्दांत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या 'अशिक्षित' टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. अंकुशनगर येथील निवासस्थानी त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला.

जरांगे पाटील म्हणाले, "मी अशिक्षित असताना जर तुम्हाला रडकुंडीला आणले, तर आमचे सुशिक्षित लोक बोलायला लागले तर तुझे काय होईल याचा विचार कर." भुजबळांना हे चांगलेच माहीत आहे की, मी अशिक्षित आहे की सुशिक्षित. मी जीआर काढला तरी त्यांना सुधारता येत नाही, ते पूर्णपणे पागल झाले आहेत, असा पलटवारही जरांगे यांनी केला.

मराठा नेत्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावीजरांगे यांनी यावेळी मराठा आमदार आणि खासदारांना आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले. "मराठ्यांच्या सर्व नेत्यांना प्रश्न विचारला गेला आहे, त्यामुळे सगळ्यांनी सांगितले पाहिजे की, आम्हाला १० टक्के एसईबीसी आरक्षण पाहिजे, पण ते ५० टक्क्यांच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे," असे त्यांनी ठामपणे सांगितले.

प्रकाश आंबेडकरांना विनंतीयावेळी जरांगे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. "मी प्रकाश आंबेडकर यांना मानतो, ते हुशार आहेत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत. त्यांनी एखादा सल्ला दिला तर तो ऐकायला पाहिजे. मात्र, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज म्हणून तुम्ही एका जातीच्या बाजूने बोललात आणि दुसऱ्या जातीच्या विरोधात गेलात, असा संदेश जाऊ नये. तुम्ही सगळ्या जातींना सारखे धरावे," अशी विनंती जरांगे यांनी केली.

'आत्महत्येवर राजकारण करू नका'ओबीसी समाजातील तरुणाच्या आत्महत्येवर बोलताना जरांगे पाटील भावूक झाले. "मराठा असो की ओबीसी, कोणत्याही गरीब लेकराने आत्महत्या करू नये," असे आवाहन त्यांनी केले. राजकीय नेते अशा घटनांवर लगेच राजकारण करतात. भुजबळ आणि पंकजा मुंडे यांच्या सांत्वन भेटीवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, "या लोकांना लोकांच्या लेकराबाळांचे जीवन गेल्याची पर्वा नसते, त्यांना फक्त राजकारण करायचे असते. आम्ही त्या गरीब कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत."

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण