शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
3
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
4
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
5
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
6
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
7
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
8
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
9
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
10
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
11
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
12
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
13
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
14
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
15
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
16
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
17
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
18
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
19
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
20
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!

महाकाळा येथे पत्नीने केला पतीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 00:19 IST

एका महिलेने पतीच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार करून खून केल्याची घटना अंबड तालुक्यातील महाकाळा (जि.जालना) येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअंकुशनगर : एका महिलेने पतीच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार करून खून केल्याची घटना अंबड तालुक्यातील महाकाळा (जि.जालना) येथे घडली. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास समोर आली असून, या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणिक जिजा मुळे (६०) असे मयताचे नाव आहे.महाकाळा येथील माणिक जिजा मुळे यांचे दोन विवाह झाले आहेत. त्यांची पहिली पत्नी सत्यभामा या माहेरी गेल्या होत्या. तर माणिक मुळे व त्यांची दुसरी पत्नी शारदा हे दोघे रविवारी रात्री घरात झोपले होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास पतीला कोणीतरी माणसे मारत असल्याचे सांगत शारदा मुळे या गावचे पोलीस पाटील राजेंद्र कव्हाळे यांच्याकडे धावत गेल्या. कव्हाळे व इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहिले असता माणिक मुळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे सपोनि शिवानंद देवकर, पोउपनि हनुमंत वारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ठसे तज्ज्ञ, श्वान पथकास पाचरण करण्यात आले. मात्र, माग काढण्यासाठी श्वानाला कोणीही वस्तू आढळली नाही. घराचे दरवाजे, कड्या तुटलेले आढळून न आल्याने हा बनाव असल्याचा संशय घेत पोलिसांनी शारदा मुळे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखविताच शारदा मुळे यांनी आपण पतीच्या डोक्यात अवजड किंवा कोणत्या तरी लोखंडी वस्तूने वार करून खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी मयताची पहिली पत्नी सत्यभामा मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शारदा मुळे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संपत्तीच्या वादातून कृत्यमहाकाळा येथील माणिक जिजा मुळे यांना गावच्या शिवारात १२ एकर शेती आहे. लग्नानंतर त्यांना मूलबाळ झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी पहिल्या लग्नानंतर पंधरा वर्षानंतर दुसरे लग्न केले.ब्मात्र, तरीही त्यांना मुलबाळ झाले नाही. दोन लग्नानंतरही मूलबाळ होत नसल्याने एखादे मूल दत्तक घेण्याची चर्चा माणिक मुळे करीत होते. त्यामुळे संपत्तीच्या वादातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार