शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

वानडगाव येथे साडेसात हजार कामगंध सापळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:44 AM

कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने उत्कृष्ठ कापूस पुढाकार प्रकल्पाद्वारे सामूहिकरीत्या कपाशीवर हल्ला करणाऱ्या शेंदरी बोंडअळीवर मात करण्यासाठी ७५० एकर क्षेत्रावर जवळपास साडेसात हजार कामगंध सापळे बसवून अनोखा प्रयोग केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने उत्कृष्ठ कापूस पुढाकार प्रकल्पाद्वारे सामूहिकरीत्या कपाशीवर हल्ला करणाऱ्या शेंदरी बोंडअळीवर मात करण्यासाठी ७५० एकर क्षेत्रावर जवळपास साडेसात हजार कामगंध सापळे बसवून अनोखा प्रयोग केला आहे.अशा प्रकारचा कामगंध सापळे बसविण्याचा हा राज्यातील कदाचित पहिलाच प्रयोग असावा, असे सांगण्यात आले. वानडगाव येथे लागवडीखालील क्षेत्र जवळपास १८ हजार एकर आहे. त्यापैकी ७५० एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. दोन वर्षांपूर्वी शेंदरी बोेंडअळीमुळे कपाशीचे उत्पन्न निम्यापेक्षा अधिक घटले होते. यावर प्रभावी उपाय म्हणून कृषी विज्ञान केंद्राने त्यावेळी देखील विशेष उपाययोजना सुचविल्या होत्या.गुजरातमधून आलेल्या शेंदरी बोंडअळीने संपूर्ण महाराष्ट्रात हल्लाबोल केला होता. त्यातून सावरण्यासाठी शेतक-यांनी त्यावेळी कपाशीची लागवड लवकर करून त्याची वेचणी देखील गतीने करण्यात आली. राहिलेल्या प-हाट्यांचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी त्या जाळून टाकण्यात आल्या होत्या. एवढ्यावरही बोंडअळीने २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढले होते. शेंदरी बोंडअळीचा आकार तांदळाच्या दाण्याऐवढा असल्याने तिचा हल्ला झाल्यावर प्रथमदर्शनी लक्षात येत नाही. परंतु ज्यावेळी उगवलेल्या कपाशीच्या पानांवर छिद्र पडतात. त्यावेळी या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात येते. सामूहिक उपाययोजने अंतर्गत कामगंध सापळे बसविण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ अजय मिटकरी तसेच वानडगाव येथील प्रवीण एखुंडे, पांडुरंग जºहाड, सुजीत जोगस, सतीश प्रधान, सचिन कोल्हे, सुखदेव नरवडे, तुषार थिटे, कोमल घारे यांची उपस्थिती होती. या सामूहिक उपाययोजनेतून नेमका किती फरक पडतो, याचा अभ्यास करण्यात येणार आहे.शेंदरी बोंडअळी : राज्यातील पहिला सामूहिक प्रतिबंधक प्रयोगसध्या मका पिकावर लष्करी अळीने हल्ला चढविला आहे. त्यामुळे मक्याचे पीक धोक्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी असाच हल्ला शेंदरी बोंडअळीने कपाशी पिकावर केला होता. त्यातून शेतक-याचे मोठे नुकसान झाले होते. कपाशीवर पडलेल्या या बोंडअळीमुळे कपाशीचा दर्जाही घसरला होता.याचा परिणाम म्हणून शेतक-यांना कपाशीला पाहिजे तसा भाव मिळाला नव्हता. ही बाब कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख कृषीभूषण विजयअण्णा बोराडे, मुख्य समन्वयक एस.व्ही. सोनवणे यांनी गांभिर्याने घेतल्याची माहिती शास्त्रज्ञ अजय मिटकरी यांनी दिली. वानडगावमध्ये आज सर्वत्र उत्साही वातावरण होते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रscienceविज्ञानFarmerशेतकरी