शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पानशेंद्रा शिवारातील शेकडो एकर फुलशेती दुष्काळामुळे उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:41 IST

दुष्काळी स्थितीचा फटका तालुक्यातील पानशेंद्रा येथील फुलशेतीला बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळी स्थितीचा फटका तालुक्यातील पानशेंद्रा येथील फुलशेतीला बसला आहे. विहिरी, कूपनलिका कोरड्याठाक पडल्याने मुद्दलवार बंधूंंनी २० एकरावरील फुलशेती नांगरून घेतली. तर पानशेंद्रा व परिसरातील शेकडो एकरवरील फुलशेतीही पाण्याअभावी उद्ध्वस्त झाली आहे.पानशेंद्रा हे गाव फुलशेतीसाठी प्रसिध्द आहे. या लहानशा गावातील काही शेतकरी फुलांची शेती करतात. या गावच्या शिवारात कृष्णराव मुद्दलवार, चंद्रकांत मुद्दलवार व त्यांच्या भावंडांची वडिलोपार्जित जमीन आहे. मुद्दलवार कुटुंबीय २० एकरावर फुलशेती करतात. यात शेवंती, गलांडा, गुलाब, निशिगंध, झेंडू, मोगरा जरबेरा आदी विविध प्रकारच्या फुलांचा समावेश आहे. या शेतातील फुले पुणे, नागपूर, हैदराबाद, मुंबई, इंदौर आदी ठिकाणच्या बाजारात विकली जातात. जालना शहरातील बाजारपेठेतही पानशेंद्रा येथील फुलांची आवक होते.मुद्दलवार यांच्या शेतात चार विहिरी, चार कूपनलिका आहेत. मात्र, दुष्काळामुळे या शेतातील जलस्त्रोत कोरडेठाक पडले आहेत. पाण्याअभावी २० एकरावरील फुलशेती मोडीत निघाली आहे. गुलाबाची रोपंही जळून गेली आहेत. पाण्याअभावी फुलांची रोपं, झाडी वाळून गेली आहेत. त्यामुळे मुद्दलवार बंधूंनी शेतात नांगर फिरवून मशागतीची कामे उरकून घेतली आहेत. यंदा चांगला पाऊस झाला तर पुन्हा फुलशेती करण्याचे नियोजन मुद्दलवार बंधूंनी केले आहे.मुद्दलवार यांच्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांची फुलशेतीही दुष्काळामुळे मोडीत निघाली असून, शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. फुलांच्या उत्पादनात घट झाल्याने बाजारपेठेतील फुलांचे दरही वाढले आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रdroughtदुष्काळFarmerशेतकरी