शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पावन तपोभूमीचा आदर करा-प.पू. प्रतिभाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:36 IST

प. पू. गुरु गणेशलालजी म. सा. यांच्या पदस्पर्शाने जालना पावन भूमी झालेली असून, तिचा आदर करून गुरूगणेश महाराजांनी घालून दिलेल्या तत्त्वज्ञानाचे प्रत्यक्ष जीवनात आचरण करण्याची गरज डॉ. प. पू. श्री प्रतिभाजी म. सा. यांनी बोलून दाखविली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प. पू. गुरु गणेशलालजी म. सा. यांच्या पदस्पर्शाने जालना पावन भूमी झालेली असून, तिचा आदर करून गुरूगणेश महाराजांनी घालून दिलेल्या तत्त्वज्ञानाचे प्रत्यक्ष जीवनात आचरण करण्याची गरज डॉ. प. पू. श्री प्रतिभाजी म. सा. यांनी बोलून दाखविली.सोमवारी गुरूगणेश महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त हजारो भाविकांनी त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. जालन्यासह अन्य राज्यातून भाविकांची मोठी उपस्थिती होती. सकाळी जैन गुरूंनी प्रवचन दिले. यावेळी गुरूगणेश महाराजांचे महत्व आणि त्यांनी केलेल्या तपस्येचे फळ आपण भोगत असल्याचे सांगून जालन्यात गुरूगणेश महाराजांची समाधी असल्याने जालना शहर पावन झाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.यावेळी सकाळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी समाधी स्थळास भेट देऊन दर्शन घेतले. मुुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडून पाच कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करुन घेणार असल्याची ग्वाही खोतकर यांनी यावेळी बोलतांना दिली.यावेळी धर्मसभेत प. पू. अर्चनाश्रींजी, आचार्य प. पू. श्री शिवमुनिजी म.सा. यांचे आज्ञानुवर्ती उपप्रदवर्तक प. पू. श्री. विवेकमुनिजी, श्रमण संघीय उपप्रवतक पंडितरत्न प. प. श्री. प्रमोदमुनिजी म. सा. तसेच शासन प्रभाविका प. पू. श्री दिलीपकंवरजी, स्वाध्यायप्रेमी प. पू. उज्वलकंवरजी, आचार्य सम्राट प. पू. श्री आनंदऋषिजींच्या शिष्या प. पू. श्री अर्चनाश्रीजीं म. सा. (मिरा) प. पू. सुशिलकंवरजी, प. पू. किरणसुधाजी, प. पू. श्री गुलाबकंवरजी, प. पू. प्रशांतकंवरजी, प. पू. श्री नमीताजी, प. पू. पुण्यस्मिताजी, प. पू. अनुप्रेक्षाजी, प. पू. दर्शनप्रभाजी आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी मंगलाचरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल यांनीही विचार व्यक्त करून गुरू गणेश महाराजांच्या समाधीचा परिसर विकसित करण्यास यापूर्वीही मदत केली असून, पुढेही करणार असल्याचे ते म्हणाले. उपस्थितांचे आभार श्रावक संघाचे विश्वस्त कचरुलाल कुंकूलोळ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष डॉ. गौतमचंद रुणवाल, उपाध्यक्ष नरेंद्र लुणिया, महामंत्री स्वरुपचंद ललवाणी, सहमंत्री भरतकुमार गादिया, कोषाध्यक्ष विजयराज सुराणा, विश्वस्त संजयकुमार मुथा, सुदेशकुमार सकलेचा, डॉ. धरमचंद गादिया, डॉ. कांतीलाल मांडोत, सुरजमल मुथा आदींनी परिश्रम घेतले. सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रमcommunityसमाज