शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

कृषी विज्ञान केंद्राचा सर्वोत्कृष्ट ‘निक्रा केव्हीके’ पुरस्काराने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 12:31 AM

जालना तालुक्यातील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रास ‘सर्वोत्कृष्ट निक्रा केव्हीके-२०१९’ या पुरस्काराने मंगळवारी हैदराबाद येथे सन्मानित करण्यात आले.

लोकमत् ा न्यूज नेटवर्करामनगर : जालना तालुक्यातील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रास ‘सर्वोत्कृष्ट निक्रा केव्हीके-२०१९’ या पुरस्काराने मंगळवारी हैदराबाद येथे सन्मानित करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांनी हा पुरस्कार स्वीकारला.भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहानिदेशक कृषी विस्तार डॉ. ए. के. सिंग यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सहाय्यक महानिदेशक नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन डॉ. एस. भास्कर, हैदराबाद केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्थेचे संचालक डॉ. जी. रवींद्र चारी, डॉ. एम. प्रभाकर, डॉ. जे. व्ही. एन. एस. प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.निक्रा म्हणजे राष्ट्रीय हवामान अनुकूल शेती नवकल्पना प्रकल्प असून तो देशातील १२१ हवामान संवेदनशील जिल्ह्यात २०११ पासून कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबविला जात आहे. या कृषी विज्ञान केंद्रांची वार्षिक आढावा कार्यशाळा हैदराबाद येथे ४ ते ६ जून या कालावधीत होत आहे. या कार्यशाळेचे औचित्य साधून हे पुरस्कार देण्यात आले.बदलत्या हवामान परिस्थितीशी लढा देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने काय प्रयत्न केलेत व कोणते हवामान अनुकूल तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले, त्याचा किती शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदा झाला या निकषावर आधारीत प्रत्येक झोनमधून दोन कृषी विज्ञान केंद्रांना हे पुरस्कार देण्यात आले.देशात एकूण ११ झोन आहेत. केव्हीके जालना हे हा पुरस्कार मिळणारे महाराष्ट्रातील एकमेव विज्ञान केंद्र आहे. बदनापूर तालुक्यातील कडेगाव आणि वरुडी या गावात कृषी विज्ञान केंद्राने रेशीम उद्योग, शेळीपालन, कुक्कुटपालन, शेततळे, हवामान अनुकूल वाणांचा प्रसार, भाडेतत्वावर अवजारे बँक, कापूस पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन, शेंदरी बोंडअळीचे नियंत्रण, विहीर पुनर्भरण तंत्रज्ञान, मोसंबीच्या बागा वाचविण्यासाठी केलेले प्रयत्न या बाबींची नोंद घेण्यात आली.जालन्याच्या विज्ञान केंद्राला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्राचे अध्यक्ष तथा कृषीभूक्षण विजयअण्णा बाराडेंसह अन्य तज्ज्ञांचे सर्वत्र स्वागत होत आहे.

टॅग्स :scienceविज्ञानJalanaजालना