शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मोदी-शाहांच्या सरकारमध्ये देवदेवतांच्या नावाखाली हिंदूंचीच अडवणूक; जरांगेंचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 12:27 IST

'देव-देवतांच्या नावाखाली हिंदूंचीच अडवणूक का?' मोदी, शाह यांना जरांगेंचा थेट सवाल

वडीगोद्री ( जालना): मराठा आरक्षणासाठी निर्णायक लढाईची घोषणा करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट केंद्र सरकारला आव्हान दिले आहे. मराठा आंदोलनाची अडवणूक करण्यासाठी सरकार देव-देवता आणि सणांचा आधार घेत असल्याचा आरोप करत, जरांगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

वडीगोद्री येथून मुंबईकडे कूच करण्यापूर्वी मराठा बांधवांशी संवाद साधताना जरांगे म्हणाले, "आम्ही पिढ्यानपिढ्या हिंदू देवतांची पूजा करतो, तरीही सणासुदीच्या काळात आमचीच अडवणूक का? देव-देवतांच्या नावाखाली हिंदूंचीच अडवणूक केली जात आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी हिंदू विरोधी म्हणून कोण काम करतं याचं उत्तर द्यावं."

जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. "फडणवीस यांना त्यांची चूक झाकण्यासाठी देव-देवतांना पुढे केलं जात आहे. इंग्रजांच्या काळातही उपोषणं रोखली गेली नाहीत, पण हे सरकार तेच करत आहे," असे ते म्हणाले. या माध्यमातून सरकार मराठा समाजाच्या आंदोलनाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे.

ही आरपारची शेवटची लढाई, डोक्याने जिंकायची आहेमराठा आरक्षणासाठीची आता 'आरपारची' लढाई असून, ही लढाई संयम आणि डोक्याने जिंकायची आहे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केले आहे. जरांगे म्हणाले की, "ही आपली शेवटची लढाई आहे. आपल्याला डिवचण्याचा प्रयत्न केला जाईल, पण कोणत्याही परिस्थितीत संयम ढळू देऊ नका. मराठा समाजाची मान खाली जाईल असं कुणीही वागू नये."

सगळ्यांनी साथ द्याआपले आंदोलन शांततेत सुरू राहील, याची खात्री देत ते म्हणाले, "एकही दगडफेक किंवा जाळपोळ करायची नाही. जोपर्यंत ही लढाई जिंकत नाही, तोपर्यंत सावध राहायचं आहे." राजकारणात असलेल्या मराठ्यांना त्यांनी समाजाचं रक्षण करण्याची संधी सोडू नका, असे आवाहन करत सगळ्यांनी साथ देण्याची विनंती केली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालनाAmit Shahअमित शाहDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस