शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

साठवण तलावातून जाणारा समृद्धी महामार्ग अडवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:34 IST

शेतक-यांनी गुरुवारी समृध्दी महामार्गाचे काम बंद पडले. तसेच जो पर्यत मावेजा मिळत नाही तोपर्यंत काम होऊ देणार नसल्याचा पवित्रा शेतक-यांनी घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राजेवाडी साठवण तलावातून समृध्दी महामार्ग जात आहे. या तलावात येथील ३० शेतकऱ्यांची जमीन गेली आहे. परंतु, या शेतक-यांना योग्य मावेजा मिळाला नाही. त्यानंतर हे शेतकरी न्यायालयात गेले असता, न्यायालयाने गोदावरी विकास महामंडळाला वाढीव मावेजा देण्याचे आदेश दिले होते. परंतु, या शेतक-यांना अद्यापही मावेजा न मिळाल्याने शेतक-यांनी गुरुवारी समृध्दी महामार्गाचे काम बंद पडले. तसेच जो पर्यत मावेजा मिळत नाही तोपर्यंत काम होऊ देणार नसल्याचा पवित्रा शेतक-यांनी घेतला आहे.गोदावरी विकास महामंडळातर्फे २००६ साली केळीगव्हाण परिसरातील राजेवाडी येथे ५० एकर जागेवर तलावाची निर्मिती करण्यात आली. त्यानुसार तलावात गेलेल्या शेतक-यांची ५३ हजार रुपये एकर नुसार जमीन खरेदी करण्यात आली. परंतु, शेतक-यांनी याला विरोध करत गोदावरी विकास महामंडळाकडे वाढीव मावेजा मागितला. परंतु, महामंडळाने हा मावेजा देण्यास नकार दिला. त्यानंतर सर्वच शेतक-यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायलयानेही गोदावरी विकास महामंडळाने शेतक-यांना योग्य मावेजा देण्याचे आदेश दिले. मात्र, अद्यापही या शेतक-यांना हा मावेजा मिळाला नाही. त्यातच सध्या याच जागेवरुन समृद्धी महामार्ग जात असून, काही दिवसांपूर्वीच शेतक-यांनी समृद्धी महामार्गाचे काम बंद पाडले होते. व जोपर्यंत मावेजा मिळत नाही तो परंतु आम्ही महामार्गाचे काम होऊ देणार नसल्याचा पवित्रा शेतकºयांनी घेतला आहे. यावेळी विठ्ठल मदन, भगवान मदन, शिवाजी मदन, विष्णू मदन, बप्पासाहेब मदन, रामभाऊ मदन, देवुबा सोनवणे, गोरखनाथ मदन, शिवाजी सोनवणे, जगनाथ सोनवणे, हरिचंद्र मदन, शेषराव मदन, मीनाबाई मदन, राम मदन, सुभाष मदन, ज्ञानदेव मदन यांची उपस्थिती होती. जो पर्यंत १८/२८ प्रमाणे निकाली दाव्याचा मावेजा मिळत नाही तोपर्यंत आम्ही समृद्धी महामार्गाचे काम होऊ देणार नसल्याचे शेतकरी विठ्ठल मदन यांनी सांगितले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गFarmerशेतकरीagitationआंदोलन