शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
2
PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती
3
भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले
4
Maharashtra Politics : महायुतीत धुसफूस! "...तर आम्ही २२८ जागा मागायच्या का?", भाजपा नेत्याचा सवाल
5
'प्रियंकासमोर मोदींचा वाराणसीत 3 लाख मतांनी पराभव झाला असता', राहुल गांधींची बोचरी टीका
6
Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...
7
युवराज सिंगकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं सांत्वन, भन्नाट Video 
8
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
9
MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत आली; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज
10
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
11
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
12
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
13
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
14
कुठे गायब आहे 'जुम्मा-चुम्मा' गर्ल?, ३२ वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर
15
जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?
16
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
17
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
"बँकेत फक्त २ रुपये होते, ४ दिवस जेवली नाही; माझ्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते"
19
बस दरीत कोसळली नसती तर सर्वांना गोळ्या घातल्या असत्या; प्रत्यक्षदर्शिंनी सांगितली आपबीती...
20
IND vs PAK सामना अन् YouTuber चा जीव गेला; एक प्रश्न आणि थेट गोळीबार

अरे खोप्यामधी खोपा... सुगरणीचा चांगला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 1:01 AM

अरे खोप्यामंधी खोपा जसा सुगरणीने इनला.. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी ज्या पक्षाचे वर्णन आपल्या कवितेत केले आहे. त्या सुगरणीच्या विणीचा हंगाम सध्या सर्वत्र बहरत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : अरे खोप्यामंधी खोपा जसा सुगरणीने इनला.. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी ज्या पक्षाचे वर्णन आपल्या कवितेत केले आहे. त्या सुगरणीच्या विणीचा हंगाम सध्या सर्वत्र बहरत आहे. पूर्वी सर्वत्र दिसणारे पक्षी आज दुष्काळामुळे दिसणे दुर्मिळ झाले आहे.जीव झाडाला टांगून आपल्या कुटुंबासाठी हा पक्षी गवताची एक एक काडी इवलाशा चोचीत आणून मोठ्या कौशल्य व मेहनतीने घरटे विनतो. चिमणीच्या आकाराचा हा पक्षी राज्यभर ठराविक हंगामातच आढळतो. घरटी विणण्यासाठी गवताच्या काड्या गोळा करून विहिरीच्या कडेवर असलेल्या पिंपळ, बाभळी, बोर, काटेरी झुडूप; जे विहिरीपेक्षा उंच व विहिरीत झुकलेल्या झाडावर घरटी बनवण्यासाठी पहिली पसंती सुगरण पक्षी दाखवतो.शेतीसाठी बागायती करण्यासाठी आज विहीर खोदण्याऐवजी शेतात घेतल्या जाणाऱ्या कूपनलिका, नदी पात्रातून केली जाणारी पाईपलाईन तर विहिरीचे पुनर्भरण, तसेच ठिक ठिकाणच्या झाडांची होत असलेली तोड, यामुळे सुगरणीच्या पारंपरिक वसाहती धोक्यात आल्या आहेत. या बदलांशी जुळवून घेत या पक्ष्याने इतरत्र पण अडचणीच्या ठिकाणी वसाहती बनवण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसते. बहिणाबाईंनी सुगरणीच्या घरालाच बंगल्याची उपमा दिली आहे. या पक्ष्याची सुरू असलेली लगबग ग्रामीण भागात क्वचितच नकळत पाहायला मिळत आहे.या काळात या पक्ष्यांचा जीवनक्रम अनोखा असतो. प्रपंच सुरू करण्यापूर्वी घरटे बांधण्यास सुरुवात होते. घर बांधण्याचे काम फक्त नर करत असतो. तो अर्धवट अवस्थेतच घरट सोडून देतो. तर विणीच्या हंगामात नराला डोके व छातीवर पिवळा गर्द रंग येतो. त्यावेळी एका नराला अनेक सहचारिणी असतात. त्यामुळे तो वेगवेगळ्या गटांमध्ये त्याचा संसार फुलवत असतो.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यNatureनिसर्ग