लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : तालुक्यात बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे सर्वत्र पाणीचपाणी झाले होते.तालुक्यात मागील आठवडा भरापासून ढगाळ वातावरण व पडणाऱ्या हलक्या पावसामुळे पिकांना मोठा फायदा झाला. मात्र जलस्त्रोताची पाणी पातळीत अद्यापही वाढलेली नाही. बुधवारी दुपारी शहरासह तालुक्यातील आष्टी व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. या भागात अद्याप मोठा पाऊस न झाल्याने पाणीपातळी वाढलेली नाही. शेतकरी, नागरिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळभोकरदन तालुक्यातील पारध येथे बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. जवळपास दीड तास चाललेल्या पावसामुळे शेतकºयांची मोठी त्रेधातिरपीट उडाली.सध्या परिसरात मिरची तोडणी, कोळपणी आणि मका तसेच सोयाबीन निंदणीचे काम सुरू आहे. पारध येथे बुधवारी झालेल्या पावसाने मोठी दाणादाण उडाली. त्यामुळे शेतकरी, मजूर यांना कामे सोडून घर गाठावे लागले.
परतूर तालुक्यात जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:42 IST