शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

गरजला अन्... बरसलाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 00:38 IST

गेल्या चार महिन्यांपासून प्रचंड उकाड्याने हैराण असलेल्या जालनेकरांना मंगळवारी झालेल्या धुवाधार पावसाने दिलासा दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या चार महिन्यांपासून प्रचंड उकाड्याने हैराण असलेल्या जालनेकरांना मंगळवारी झालेल्या धुवाधार पावसाने दिलासा दिला आहे. दुपारी तीन तास हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने शहरात उत्साह निर्माण झाला होता. दरम्यान कुंडलिका नदीवर बांधण्यात आलेले दोन्ही बंधारे भरभरून वाहिल्याने पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.जालना जिल्ह्याचा विचार करता, मागील वर्षी केवळ ६१ टक्के एवढा कमी पाऊस झाला होता. त्याचा परिणाम तीव्र दुष्काळासह पाणीटंचाईवर जाणवला. कधी नव्हे तेवढे ७०० पेक्षा अधिक टँकर जिल्ह्यात लावावे लागले. त्यामुळे यंदा सर्वांच्या नजरा या पावसाकडे होत्या. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात थोडा-बहूत पाऊस पडल्याने आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु नंतर पुन्हा पावसाने उघडीप दिल्याने चिंता वाढली होती.मंगळवारी किमान जालना शहर व परिसरात दुपारनंतर मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली.कधी मध्यम तर कधी हलक्या सरींनी जालनेकरांना चिंब केले. विशेष म्हणजे या पहिल्याच झालेल्या जोरदार पावसात कुंडलिका नदीवर बांधालेला बंधारा भरून वाहिला. त्यामुळे नदीलाही पूर आला होता. एकूणच या पावसामुळे आता जालना तालुक्यात पेरण्यांना वेग येणार यात शंका नाही.जालना शहरातील सखल भागात पाणी साचल्याने अनेक रिक्षा, दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये पाणी गेल्याने अनेकांना त्या ढकलत न्याव्या लागल्या. तर जुना जालना भागातील टाऊन हॉल येथील मुख्य चौकात असलेल्या नालीवर ढापा नसल्याने एक कार त्यात पडल्याने अडकून पडली होती. दरम्यान समस्त महाजन ट्रस्टने चंदनझिरा, दावलवाडी परिसरातील नाला रूंदीकरण केल्याने तेथेही मोठे पाणी साठले आहे.बच्चे कंपनी होती भिजण्यात मग्नऐन शाळा सुटण्याच्या वेळेस पाऊस सुरू होता. त्यामुळे बच्चे कंपनीने पावसात भिजण्याचा आंनद घेतल्याचे दिसून आले.अनेकांकडे छत्री असतानाही विद्यार्थ्यांनी ती उघडली नसल्याचे दिसून आले. शाळेच्या मैदानासह रस्त्यावरही बच्चे कंपनीने भिजण्याचा आनंद लुटला.जालना शहरात घरात, दुकानात घुसले पाणीजालना शहरात मंगळवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये घरामध्ये पाणी शिरले होते. हे पाणी काढताना नागरिकांची चांगलीच दमछाक झाली.एकूणच नाल्यांवरील वाढलेली अतिक्रमणे यामुळे नाल्यांची रूंदी कमी झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून घरात पाणी शिरत आहे.

टॅग्स :RainपाऊसMonsoon Specialमानसून स्पेशलDamधरण