शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग थांबविण्याविरोधात आज सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:26 IST

नाशिक येथील कडा विभागाचे अधिक्षक अभियंता तथा प्रशासक यांनी गंगापूर व पालखेड धरणातून जायकवाडी धरणात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग थांबविण्याचा आदेश १ नोव्हेंबर २०१८ रोजी दिलेला होता. सदरील आदेशाच्या संदर्भात सोमवारी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणमध्ये सुनावणी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नाशिक येथील कडा विभागाचे अधिक्षक अभियंता तथा प्रशासक यांनी गंगापूर व पालखेड धरणातून जायकवाडी धरणात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग थांबविण्याचा आदेश १ नोव्हेंबर २०१८ रोजी दिलेला होता. सदरील आदेशाच्या संदर्भात सोमवारी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणमध्ये सुनावणी होणार असल्याची माहिती या प्राधिकरणाचे सचिव डॉ. सुरेश कुलकर्णी यांनी तसेच मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचचे अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील यांनी प्रसिध्दी पत्राव्दारे दिली.दरम्यान, या सुनावणीसाठी आता राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनाही उपस्थित राहून बाजू मांडावी लागणार आहे.सदरील प्रकरणी होणारी सुनावणी सोमवारी दुपारी २ वाजता मुंबई येथील जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या कार्यालयात घेतली जाणार असल्याचे लाखे पाटील म्हणाले.एकूणच मराठवाड्यातील तीव्र दुष्काळ लक्षात घेता न्यायालयाकडूनही याबाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे लाखे पाटील यांनी सांगितले. पाण्याच्या मुद्दयावर राजकारण बाजूला ठेवून आपण पुढाकार घेत असल्याचे ते म्हणाले.धरण समूहातून एकूण २५४.५० द.ल.घ.मी म्हणचेच ८.९९ टीएमसी पाणी सोडण्याचे स्पष्ट देण्यात आले होते. याशिवाय वरील सर्व धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करणे, तसेच पाणी वहनावर नियंत्रण ठेवणे, पाण्याची नोंद ठेवणे, अहवाल शासनास सादर करणे ही संपूर्ण जबाबदारी मुख्य अभियंता (जलसंपदा) जलसंपदा विभाग, उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिक यांची असेल आणि सदर आदेश हे तात्काळ अंमलात आणावेत, असेही २३ आॅक्टोबरच्या आदेशात नमूद केलेले होते, असेही डॉ. संजय लाखे पाटील यांनी म्हटले आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी