शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

निकालाने शिंदे परिवारात दसरा, दिवाळीपेक्षाही आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 01:04 IST

सोळा वर्षाच्या संघर्षानंतर न्याय मिळाला अखेर सत्याचाच जय झाला अशा शब्दांत दरोडा, बलात्कार व खून खटल्यातून निर्दोष सुटलेल्या आरोपींच्या कुटुंबियांनी दिली.

फकिरा देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : सोळा वर्षाच्या संघर्षानंतर न्याय मिळाला अखेर सत्याचाच जय झाला अशा शब्दांत दरोडा, बलात्कार व खून खटल्यातून निर्दोष सुटलेल्या आरोपींच्या कुटुंबियांनी दिली. आरोपातून निर्दोष मुक्त झाल्याने आमचा आनंद गगनात मावणार नसल्याची प्रतिक्रिया १६ वर्ष त्रास भोगलेल्या नातेवाईकांनी लोकमतशी बोलताना दिली.नाशिंक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील बेलटगव्हाण शिवारात ५ जून २००३ रोजी सशस्त्र दरोडा, खून व बलात्काराच्या खटल्यात सहा जणांना फाशीची शिक्षा झाली होती. ती शिक्षा दहा वर्षापूर्वी रद्द करण्यात आली होती, तर न्यायालयाने ५ मार्च रोजी या सर्वाची या खटल्यातूनच निर्दोष मुक्तता केली आहे त्यामध्ये राजू अप्पा शिंदे, अंबादास लक्ष्मण शिंंदे, राजू म्हसू शिंदे, बापू अप्पा शिंदे अंकुश मारोती शिंदे सर्व राहणार भोकरदन या चौघांची न्यायालयाने मंगळवारी निर्दोष मुक्तता केली. तर पूर्वी अंकुश मारोती शिंदे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. न्यायालयाच्या या निर्णयामुळे कुटुंबियांनी बुधवारी अखेर न्याय मिळाल्याने आनंदोत्सव साजरा केला.न्या़ एक़े़ सिक्री, न्या़एस़अब्दुल नझीर, न्या एम़आऱशहा यांच्या खंडपीठाने नऊ वर्षापूर्वी यांना फाशीची शिक्षा सुनावल्याची चूक मान्य करून चूक सुधारून या सहा जणांना निर्दोष मुक्त केले. त्यातही उच्च व सर्वोच्च न्यायालयातील अपील व त्या नंतर सर्वोच्च न्यायालयातील फेरविचार याचिका अपयशी ठरल्यानंतर सुध्दा स्वत: हून चूक सुधारून या सहा जणांना न्याय देण्याचे काम केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाची माहिती त्यांना मिळताच वस्तीवर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शेवटी सोळा वर्षानी का होईना; सत्याचा विजय झाला असल्याचे मत त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केले आहे.आपले वडील घरी येणार असल्यामुळे मुला -मुलींचा आनंद गगनात मावत नसल्याचे दिसून आले. अंबादास शिंदे यांच्या घरामध्ये आई तुळसाबाई लक्ष्मण शिंंदे, पत्नी बहिणाबाई शिंदे, मुले रामदास शिंदे, संजू शिंदे, किशोर शिंंदे, तर राजू म्हसू शिंदे यांच्या घरामध्ये पत्नी राणी शिंदे, मुलगी कोमल शिंदे, सुशीला शिंदे, पुष्पा शिंदे, तर बापू अप्पा शिंदे ंयांच्या घरामध्ये पत्नी राधाबाई शिंदे, संतोष शिंदे, कृष्णा शिंंदे, व मुलगी पूजा शिंदे असा परिवार आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMurderखूनFamilyपरिवार