शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आखाती युद्धाचा जालना स्टील हबला मोठा फटका; कच्च्या मालाचा तुटवडा, टनमागे तीन हजारांची वाढ

By विजय मुंडे  | Updated: March 10, 2026 20:10 IST

यामुळे बांधकाम क्षेत्राला फटका बसला असून, नवीन घर खरेदी करणाऱ्यांचे बजेट कोलमडण्याची चिन्हे आहेत.

जालना : आखाती देशांमध्ये इस्रायल आणि इराण-अमेरिका यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचे सावट आता महाराष्ट्राच्या स्टील उद्योगावर गडद होऊ लागले आहे. कच्च्या मालाची आवक घटल्याने आणि उत्पादन खर्चात वाढ झाल्याने, गेल्या महिन्याभरात स्टील सळईच्या दरात टनमागे तीन हजार रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे बांधकाम क्षेत्राला फटका बसला असून, नवीन घर खरेदी करणाऱ्यांचे बजेट कोलमडण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील स्टील उत्पादनात जालन्याचा सिंहाचा वाटा आहे. येथील कारखान्यांमध्ये वर्षाला साधारणतः ४.५ दशलक्ष टन स्टील सळईचे उत्पादन होते. या प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर कच्चा माल आणि ‘आयर्न ओर’ची आवश्यकता असते. जालन्यातील उद्योजक देशातील एकूण गरजेच्या सुमारे १० टक्के कच्चा माल थेट आयात करतात. यातील मोठा हिस्सा इराण आणि ओमानसारख्या आखाती देशांतून येतो. आखाती देशांतून येणारा कच्चा माल प्रामुख्याने ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ या सागरीमार्गे भारतात येतो. मात्र, युद्धामुळे या मार्गावरील जहाजांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कच्च्या मालासोबतच उद्योगाला लागणारा कोळसा आणि गॅसच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला असून, वाढलेल्या दरांमुळे उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. परिणामी, महिनाभरापूर्वी ५८ हजार रुपये प्रति टन असलेले स्टीलचे दर आता ६१ हजार रुपयांवर पोहोचले आहेत.

इंधन दरवाढीचे संकटभारताला होणारी कच्च्या तेलाची आयात प्रामुख्याने स्ट्रेट ऑफ होर्मुज मार्गावरूनच होते. या भागात तणाव वाढल्यास कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे. इंधनाचे दर वाढल्यास रस्ते वाहतुकीचा खर्चही वाढेल, ज्याचा थेट परिणाम स्टीलच्या अंतिम किमतीवर होईल. आधीच कच्च्या मालाचा तुटवडा असताना आता वाहतूक खर्च वाढल्यास स्टील आणखी महाग होऊ शकते.

सर्वसामान्यांना फटकाआखाती देशांतून आयात होणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर सध्या मोठा परिणाम झाला आहे. गॅसचा तुटवडा आणि संभाव्य इंधन दरवाढ यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. हे युद्ध दीर्घकाळ खेचले गेले, तर भविष्यात स्टीलचे दर आणखी वधारतील. याचा थेट फटका मोठ्या पायाभूत प्रकल्पांसह सर्वसामान्यांनाही बसणार आहे.- घनश्याम गोयल, अध्यक्ष, स्टील उद्योग समूह, जालना

English
हिंदी सारांश
Web Title : Gulf War hits Jalna steel: Raw material shortage, prices rise.

Web Summary : Gulf tensions disrupt Jalna's steel industry, impacting raw material imports and driving prices up by ₹3,000 per ton. Construction faces challenges, and home buyers' budgets are strained due to increased costs.
टॅग्स :Jalanaजालनाbusinessव्यवसाय