चित्ररथास जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविला हिरवा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 12:48 AM2019-10-04T00:48:17+5:302019-10-04T00:48:34+5:30

भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणात जास्तीत - जास्त मतदारांनी आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजवावा, यासाठी प्रशासनाच्यावतीने मतदार जनजागृती चित्ररथ तयार करण्यात आला आहे

The green flag shown by the Chitrarthas collectors | चित्ररथास जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविला हिरवा झेंडा

चित्ररथास जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविला हिरवा झेंडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणात जास्तीत - जास्त मतदारांनी आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजवावा, यासाठी प्रशासनाच्यावतीने मतदार जनजागृती चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथास गुरुवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी हिरवा झेंडा दाखवून मतदार जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ केला. तर उपजिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतियाळे यांच्या हस्ते फीत कापण्यात आली.
स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती करण्यासाठी हा चित्ररथ विविध भागात मतदार जनजागृती करणार आहे. याव्दारे मतदारांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदारसंघात १५ लाख २१ हजार ३२४ मतदार आहेत.
जिल्हा प्रशासनामार्फत ही स्वीप अंतर्गत मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात असून, मतदारांनी मतदानाच्या प्रक्रियेत सक्रीय सहभाग घ्यावा, यासाठी प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यातील जास्तीत- जास्त मतदारांनी २१ आॅक्टोबर रोजी मतदानाचा हक्क बजावून आपलं कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी बिनवडे यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: The green flag shown by the Chitrarthas collectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.