तुरीचे १ कोटी रूपये मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 01:13 AM2018-04-01T01:13:29+5:302018-04-01T01:13:29+5:30
हमीभावाने खरेदी केलेल्या तुरीच्या थकित आठ कोटी रूपयांपैकी १ कोटी ५८ लाख ८६ हजार रूपये शनिवारी ३४२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. त्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : हमीभावाने खरेदी केलेल्या तुरीच्या थकित आठ कोटी रूपयांपैकी १ कोटी ५८ लाख ८६ हजार रूपये शनिवारी ३४२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. त्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला.
‘तुरीचे आठ कोटी रूपये थकित’ या मथळयाखाली लोकमतने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत नाफेडने पैशांची तरतूद केली.
जिल्ह्यातील आठ हमीभाव केंद्रांवर मार्च अखेर १७ हजार ७९७ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. त्यापैकी ३४२ शेतक-यांनी विक्री केलेलया २९१४ क्विंटल तुरीचे तुरीचे १ कोटी ५८ लाख रूपये शनिवारी शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. यामुळे गत दोन महिन्यांपासून तुरीच्या रकमेच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतक-यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. हमीभावाने तूर खरेदी केल्यानंतर आठवड्यानंतर शेतक-यांच्या बँक खात्यात तुरीची रक्कम जमा करण्यात येईल, अशी नाफेडकडून सांगण्यात आले होते. मात्र, दोन महिने उलटूनही तुरीचे पैसे शेतक-यांना न मिळाल्याने शेतक-यांमधून संताप व्यक्त केला जात होता. शेतकरी हमी भाव केंद्रावर चकरा मारून रकमेबाबात विचारणा करीत होते. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत प्रशासकीय पातळीवर ताबडतोड हालचाली करत चारच दिवसात शेतक-यांच्या खात्यात तुरीचे पैसे जमा करण्यात आले.