शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

तलवारीने वार करून सोने व्यापाऱ्याला लुटले; पोलिसांकडून आरोपींचे स्केच जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 20:08 IST

दरोडेखोरांनी सोने -चांदीच्या दागिन्यांसह ११ लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला

जालना : सोने व्यापाऱ्याच्या कारचा वीस किमी अंतरावरुन पाठलाग करुन तलवारीने वार करुन ११ लाख ५३ हजार रुपयांना लुटल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी जालना - राजूर रोडवर घडली. या प्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी पोलीस संशयीत आरोपींचे स्क्रेच सोमवारी (दि.२७ ) जाहीर केले. 

जालना शहरातील विनय बाफणा यांचे राजूर येथे सोन्याचे दुकान असून, ते त्यांचा मुलगा नवनीत यांच्यासह जालना येथून राजूरला नियमित ये-जा करतात. या ठिकाणी त्यांची सोन्या - चांदीची दुकान आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता दुकान बंद करुन  ते जालन्याकडे येत होते. या दरम्यान त्यांनी राजूर येथील चौफुली सोडल्यानंतर त्यांच्या कारच्या समोरुन एक तर मागच्या बाजूने एक अशा दोन कारने त्यांच्यावर पाळत ठेवली. या तिन्ही कार जवळपास वीस किमी अंतरावर आल्यानंतर घाणेवाडी फाट्याच्या शिवारातील पुलावर समोरील कारने ब्रेक लावले, तर मागच्या कारने बाफणा यांच्या कारला मागच्या बाजूने धडक दिली. 

यावेळी दोन्ही कारमधून तीन ते चार जण हातात तलवार व बंदुक घेऊन उतरली. बाफणा यांच्या कडे येत त्यांनी ऐवज देण्याची मागणी केली. विरोध केल्यानंतर बाफणा यांच्या हातावर तलवारीने वार केले तर मुलगा नवनीत यालाही जखमी केले.  यावेळी  बाफणा यांच्या कारच्या काचा फोडून दरोडेखोरांनी सोने -चांदीच्या दागिन्यांसह ११ लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.  याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांना या दरोडेखारांचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी आता चार संशियातांचे स्केच जाहीर केले आहेत. 

आरोपी शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हानफिर्यादीने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी चार आरोपीचे स्क्रेच तयार केले आहे. सदर संशयीत आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी नसल्याचे पोलीस सांगत आहे. यामुळे या दरोड्यातील आरोपींना पकडणे हे पोलिसांसमोर एक आव्हाण उभे आहे. दरम्यान, पोलिसांनी सदर आरोपींचा   जालना जिल्ह्यासह परभणी, बीड, औरंगाबाद, अहमदनगर, बुलडाणा, हिंगोली येथेही पोलीस पथकाद्वारे शोध घेण्यात येत असल्याचे चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाले यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJalna Policeजालना पोलीस