शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कमी खर्चात गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 16:26 IST

बदलत्या वैश्विक परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येकाला कमी खर्चात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायला हवे. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी सोमवारी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बदलत्या वैश्विक परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येकाला कमी खर्चात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायला हवे. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी सोमवारी येथे केले.पद्मभूषण डॉ. बद्रीनारायण बारवाले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराजा अग्रसेन फाऊंडेशनच्या वतीने अग्रसेन भवनमध्ये उच्च शिक्षणावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. व्यासपीठावर राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी मंत्री आ. राजेश टोपे, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, माजी आयुक्त कृष्णा भोगे, महिकोचे राजेंद्र बारवाले आदींची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. काकोडकर म्हणाले, की उच्च शिक्षणाची सद्यस्थिती गंभीर आहेच. मात्र, सगळे काही सरकारनेच करावे आणि आपण केवळ बघ्याची भूमिका घ्यावी, हे योग्य नाही. यामुळे प्रगती होणार नाही. लोकसहभागातून पुढे होऊन सर्वांनी मिळून काम केल्यास या सर्व क्षेत्रात चांगली स्थित्यंतरे दिसून येतील. शिक्षण क्षेत्रातील बदल करताना प्रस्थापितांच्या विरोधाला सामोरे जावे लागेल. बदलत्या वेगवान तंत्रज्ञानाचे आव्हान आहे. लोकशाहीतील मतप्रवाह लक्षात घेऊन आपणास काम करावे लागेल. रिअ‍ॅक्टिव्ह होण्यापेक्षा प्रोअ‍ॅक्टिव्ह झाले पाहिजे. २६ कोटी शालेय विद्यार्थ्यांना ८५ लाख शिक्षक तर साडेतीन कोटी उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांना १५ लाख शिक्षक असा देशातील शिक्षणाचा पसारा असल्याचे त्यांनी सांगितले. उच्च शिक्षणाचा आजचा दर्जा घसरल्याने ४० टक्के विद्यार्थी रोजगारासाठी पात्र तर ६० टक्के अपात्र ठरत आहेत. तरुणांमध्ये नैराश्याचे वातावरण असून, पंजाबमधील समस्या तर महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या हे त्याचेच परिणाम असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. आजच्या शाळा आणि कॉलेजची रचना कालबाह्य ठरण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना हवा असेल तो अभ्यासक्रम आणि विषय निवडण्याची सुविधा निर्माण व्हायला हवी. भाषेचा अडथळा न येतो, हवे ते घटक उपलब्ध करून देण्याचे आव्हान आहे. देशात कोचिंग क्लासेसचे ४१ लाख कोटींचे अर्थकारण असून, ते शैक्षणिक बजेटइतके असल्याचे ते म्हणाले. निवृत्त प्राचार्य डॉ. रामलाल अग्रवाल प्रास्ताविक केले. परिसंवादास महिकोच्या कार्यकारी संचालिका डॉ. उषा झेर, उद्योजक सुनील रायठठ्ठा, प्राचार्य जवाहर काबरा, प्राचार्य डॉ. राजेंद्र गायकवाड, प्राचार्य कविता प्राशर, प्रा. बी. वाय. कुलकर्णी, कृषीभूषण विजयअण्णा बोराडे, प्रा. सुरेश लाहोटी, सुरेश अग्रवाल, कवयित्री रेखा बैजल, नारायण बोराडे, दिलीप अर्जुने, शिवाजी मदन, नानासाहेब देशमुख यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, वकील, विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.माजी आयुक्त भोगे : उच्च शिक्षणाचा दर्जा कमालीचा घसरलासमाज व्यवस्था बिघडल्यामुळे उच्च शिक्षणाचा दर्जा घसरल्याचे स्पष्ट मत माजी विभागीय आयुक्त कृष्णा भोगे यांनी व्यक्त केले. आजच्या शैक्षणिक परिस्थितीबाबत त्यांनी गांभिर्यपूर्वक विचार मांडून, अपेक्षित बदल सूचविले.कंत्राटी पद्धतीने काम करणारे प्राध्यापक दोनशे रुपये रोजंदारीवर शिकवण्याचे काम करतात. दारिद्र्य रेषेखाली खरे लाभार्थी तेच आहेत. उच्च शिक्षणावर सरकारचे लक्ष नसल्याचे भागे यांनी परखडपणे नमूद केले.

टॅग्स :educationशैक्षणिकArjun Khotkarअर्जुन खोतकरEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी