शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

यापुढे लातूरमध्ये ‘वंदे भारत’ची निर्मिती, फडणवीस यांची माहिती; जालना-मुंबई ‘वंदे भारत’ला पंतप्रधानांकडून हिरवी झेंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 07:06 IST

यापुढे लातूर येथील कोच फॅक्ट्रीत वंदे भारत ट्रेनची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून युरोप, अमेरिकेत ज्याप्रमाणे ट्रेन असतात, त्यांच्या तुलनेत दर्जेदार अशा भारतीय बनावटीच्या वंदे भारत रेल्वे तयार करण्यात आल्या आहेत. आज महाराष्ट्रातील सहावी वंदे भारत रेल्वे जालन्यातून धावत असून, ही जालनाच नव्हे तर मराठवाड्यासाठी आनंदाची बाब आहे. यापुढे लातूर येथील कोच फॅक्ट्रीत वंदे भारत ट्रेनची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अयोध्या रेल्वे स्थानकावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दुपारी दूरदृश्यप्रणालीद्वारे जालना-मुंबई वंदे भारत रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री अतुल सावे, आ. बबनराव लोणीकर, आ. कैलास गोरंट्याल, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, आ. राजेश राठोड, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, जालना-मुंबई वंदे भारत रेल्वेचे नागरिकांनी ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले. 

२०२४ पर्यंत इलेक्ट्रिफिकेशनचे काम : दानवेमराठवाड्यातील नागरिकांना राजधानी मुंबई येथे कामानिमित्ताने जाण्याची उत्तम सोय व्हावी, या उद्देशाने जालना येथून वंदे भारत रेल्वेचा आज शुभारंभ करण्यात आला आहे. या रेल्वेची प्रवासी क्षमता ५३० एवढी असून, एकूण आठ डबे जोडले आहेत.  

देशात वंदे भारत रेल्वेंची संख्या ३४ झाली आहे. मनमाड ते छत्रपती संभाजीनगर या दरम्यानच्या रेल्वे दुहेरीकरणासाठी एक हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. मार्चपर्यंत काम सुरू होणार आहे आणि पुढील मार्गाचे सर्वेक्षण सुरू झाले आहे.

 त्यालाही पैसे उपलब्ध करून दिले आहेत. देशात २०२४ पर्यंत संपूर्ण ब्रॉडगेजवर इलेक्ट्रिफिकेशनचे काम पूर्ण होणार आहे. सध्या ९० टक्के काम पूर्ण झाल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.

राज्यात एक लाख सहा हजार कोटींची कामे सुरू  पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रात रेल्वेचा अभूतपूर्व विकास होत आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे यासाठी विशेष प्रयत्न आहेत. राज्यात एक लाख सहा हजार कोटींची रेल्वेची कामे सुरू आहेत. यंदा १३ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. यातून अनेक कामे होणार आहेत. जसजसे रुळांचे मजबुतीकरण होईल, तसतशी ही ट्रेन पुढील दोन वर्षांत तासी २५० किलोमीटरच्या वेगाने चालेल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसrailwayरेल्वेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस