शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी परतूर पालिकेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:35 IST

नागसेननगर येथील रहिवाशांनी गुरूवारी पाण्यासाठी नगर पालिकेवर हंंडामोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : शहरातील नागसेननगर येथील रहिवाशांनी गुरूवारी पाण्यासाठी नगर पालिकेवर हंंडामोर्चा काढला. पाणी मिळेपर्यंत आंदोलन मागे घणार नसल्याचा पवित्रा संतप्त नागरिकांनी घेतला होता. शेवटी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर नागरिकांनी हे आंदोलन मागे घेतले.परतूर येथील रेल्वे गेटबाहेरील नागसेननगर येथील रहिवाशांनी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना केला. आता पावसाळा सुरू असूनही टंचाई कायम आहे. पाण्यामुळे हाल होत असल्याने संतप्त नागरिकांनी हातात हंडे घेऊन गुरूवारी सकाळी थेट नगरपालिका गाठून ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत आमच्या भागात पाण्याची सोय केली जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला. पालिका कर्मचाऱ्यांनाही आत जाण्यास मज्जाव केल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. दरम्यान, पाईपलाईन दुरूस्तीची कामे होईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन उपनगराध्यक्ष अय्युब कुरेशी, अंकुश तेलगड, राजेश भुजबळ, बाबूराव हिवाळे यांनी दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी न. प. अधीक्षक भगवान चव्हाण, पाणीपुरवठा विभाग प्रमुख अतुल देशपांडे, अजीज सौदागर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Morchaमोर्चाwater shortageपाणीकपातcivic issueनागरी समस्याagitationआंदोलन