शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

शेतकरी दाम्पत्यासह चौघांना चोरट्यांची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 01:05 IST

चोरट्यांनी शेतकरी दाम्पत्यासह चौघांना मारहाण करीत दोन ठिकाणांहून १८ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : चोरट्यांनी शेतकरी दाम्पत्यासह चौघांना मारहाण करीत दोन ठिकाणांहून १८ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवारी रात्री तालुक्यातील वाकुळणी शिवारात घडली.बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथे मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास गट क्र १७९ मधील एका महाविद्यालयातील सुपरवायझर व वॉचमन या कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून चोरट्यांनी मारहाण केली. त्यावेळी आठ हजार रूपयाचा एक मोबाईल, रोख ७०० रूपये व एका डायनुमातील १८०० रूपयांची ६ किलो तांब्याची तार चोरून नेली. तसेच जवळच असलेल्या एका शेतातील पांडुरंग सुखदेव खिल्लारे व त्यांच्या पत्नीला मारहाण केली. त्यांच्या पत्नीच्या गळयातील साडेसात हजार रूपयांचे तीन ग्रॅमचे मणीमंगळसूत्र चोरून नेले. या प्रकरणी अनिल गंगाधर कोळकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार चोरट्यांविरूध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस ठाणे अंमलदार पोहेकॉ नरवडे यांनी दिली़ दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.टॉवरच्या २४ बॅट-या लंपास; बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलजालना : चोरट्यांनी एका खाजगी कंपनीच्या टॉवरवरील २४ हजार रूपये किंमतीच्या २४ बॅटºया लंपास केल्या. ही घटना मंगळवारी रात्री अंबड तालुक्यातील चिंचखेड येथील टावर परिसरात घडली असून, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड तालुक्यातील चिंचखेड शिवारात एका खाजगी कंपनीचा टॉवर आहे. मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी या टॉवरच्या सेल्टरच्या पाठीमागील पत्रा कापून आतमध्ये प्रवेश केला.आतील २४ हजार रूपये किंमतीच्या २४ बॅट-या हातोहात लंपास केल्या. या प्रकरणी योगेश उखाजी इंगळे (रा. गोळेगाव ता. सिल्लोड जि. औरंगाबाद) यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून अज्ञात चोरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नापोकॉ सोनवणे हे करीत आहेत.

टॅग्स :DacoityदरोडाCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी