शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आरोपीचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 01:17 IST

दोन महिन्यांपूर्वी औरंगाबाद - सोलापूर मार्गावरील कोळीबोडखा परिसरात रिक्षा व ट्रक चालकाला मारहाण करून लुटले होते. या प्रकरणातील एका आरोपीचा मृतदेह पोलिसांना सापडला

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : दोन महिन्यांपूर्वी औरंगाबाद - सोलापूर मार्गावरील कोळीबोडखा परिसरात रिक्षा व ट्रक चालकाला मारहाण करून लुटले होते. या प्रकरणातील एका आरोपीचा मृतदेह पोलिसांना सापडला असून, स्थानिक गुन्हे शाखेसह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नालेवाडी शिवारात गुरूवारी रात्री घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी हा मृतदेह आढळून आल्याचे सांगण्यात आले.२१ मार्च रोजी शीतपेयांचा व्यवसाय करणा-या इस्माईल पिंजारी हे कोळीवाडा परिसरात रिक्षासह थांबले होते. त्यावेळी परिसरात लपून बसलेल्या तीन ते चार दरोडेखोरांनी इस्माईल पिंजारी यांना तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख १० हजार रूपये आणि मोबाईल लंपास केला. याच परिसरात उभ्या असलेल्या ट्रक चालकाला लुटण्याचा प्रयत्न दरोडेखोरांनी केला. परंतू, ट्रक चालकाने प्रसंगावधान राखून ट्रक भरधाव चालविला. यामध्ये चार दरोडेखोरापैकी एक दरोडेखोर यात गंभीर जखमी झाला होता. त्याच्या शरीराचे अवशेषही त्या भागात आढळून आले होते.प्रारंभी इस्माईल पिंजारी यांच्या तक्रारीवरून गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. श्वानपथक घटनास्थळी दाखल करून पोलिसांनी आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न त्यावेळी केली. परंतु, शरीराच्या अवशेषाशिवाय पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते. दरम्यान, गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंग गौर यांनी घटनास्थळी भेट देऊन खोदकाम केले असता तेथून एकाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. हा मृतदेह त्या लूट प्रकरणातील आरोपीचाच असावा असा प्रथमदर्शी अंदाज वर्तविला जात आहे. याची माहिती गौर यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश सोनवणे, तहसीलदार दत्तात्रय भारस्कर आणि वैद्यकीय अधिका-यांना कळविले. सापडलेल्या मृतदेहाच्या मांडीचे हाड आणि रक्ताचे नमुने घेऊन ते डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Crimeगुन्हाDeathमृत्यू