शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाने फुलशेती कोमेजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:45 IST

दिवसेंदिवस उन्हाची तिव्रता वाढत असल्याने फुलेही कासावीस झाली असून ‘फुलशेती’ अडचणीत आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : दिवसेंदिवस उन्हाची तिव्रता वाढत असल्याने फुलेही कासावीस झाली असून ‘फुलशेती’ अडचणीत आली आहे.तालुक्यात ‘फुलशेती’ करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या ठिकाणाहून फुले हैदराबाद, औरंगाबाद, जालनासह अन्य मोठमोठ्या शहरांत जातात. तालुुक्यातील वलखेड, चिंचोली, सालगाव, उस्मानपूर, बाबई, वरफळ, बामणीसह काही गावात फुलांची शेती शेतकरी करतात. यामध्ये गुलाब, निशिगंध, शेवंती, गलांडा, मोगरा, काकडा या फुलांची प्रामुख्याने शेती केली जाते. यातून शेतकऱ्यांना नगदी पैसा मिळण्याबरोबरच शेतीला जोड धंदाही होतो. सध्या सर्वच फुलांना चांगला भाव आहे. दीडपट भाव मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.या फुलांच्या व्यवसायातून शेतक-यांना पैसाही मिळत आहे. मात्र, यावर्षी पाऊसच कमी झाल्याने जल साठ्यांनी तळ गाठला आहे. बोअर, विहिरी आटत आहेत. कधीच न आटणारे बोअर या वर्षी हबकले आहेत. यामुळे पिके तर सोडाच; पण जनावरे व माणसांना पाणी मिळणे अवघड होण्याची भीती आहे. यामुळे तालुक्यात असलेली फुलशेतीही शेवटच्या घटका मोजत आहे. फूल झाडांची महागाची आणून लावलेली रोपे व लगडलेली फुले करपून माना टाकू लागली आहेत. उन्हाची वाढती तीव्रता व पाण्याची अडचण यामुळे फूलशेती धोक्यात आली आहे. सद्या फुलाला चांगला भाव मिळत असला तरी, उन्हाने ती करपत आहे. त्यामुळे फुलांची प्रत खराब होण्याबरोबच उत्पन्नातही घट होत आहे. उन्हाच्या चटक्याने व शुष्क झालेल्या वातावरणाने फुले सुकली आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रdroughtदुष्काळFarmerशेतकरी