शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा नदीपात्रात मच्छिमार बेपत्ता; प्रशासनाकडून २३ तासानंतर शोधकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 18:21 IST

माहिती देऊनही प्रशासनाकडून २३ तासानंतर मदतकार्य

ठळक मुद्देकानडी येथील घटना 

तळणी (जालना) : मंठा तालुक्यातील कानडी शिवारातील पूर्णा येथील नदीपात्रात मच्छिमारीसाठी गेलेला संतोष दत्तराम हिरवे (४१) हा मच्छिमार वाहून गेला. ही घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास उस्वद- कानडी शिवारात घडली. मात्र, कल्पना देऊनही घटनेच्या २३ तासानंतर मंगळवारी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास प्रशासकीय यंत्रणेने शोधकार्य सुरू केले.

मंठा तालुक्यातील कानडी येथील संतोष हिरवे हा पूर्णा नदीपात्रात मच्छिमारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. उस्वद- कानडी शिवारातील पूर्णा नदीपात्रात पाणी आल्याने संतोष हिरवे हा सोमवारी दुपारी मच्छिमारीसाठी गेला होता. मात्र, तो  वाहून गेला. घटनास्थळी उपस्थितांनी त्याचा शोध घेतला. मात्र, त्याचा पत्ता लागला नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन नदीपात्रात शोध घेतला. मात्र, त्यातही यश आले नाही. 

घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली होती. मात्र, तहसीलदार सुमन मोरे, तलाठी नितीन चिंचोले यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच परतूर येथील अग्निशमन दलाचे पथक शोधकार्यासाठी बोलाविण्यात आले होते. मात्र, दुपारी ३ वाजेपर्यंत शोधकार्यासाठी पथकही दाखल झाले नव्हते. ४.३० वाजण्याच्या सुमारास पथक घटनास्थळी दाखल झाले असून, शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. हिरवे यांचे नातेवाईक व ग्रामस्थही शोध मोहीम राबवित आहेत.

माहिती उशिरा मिळालीयाबाबत तहसीलदार सुमन मोरे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, प्रशासनाला घटनेची माहिती उशिराने मिळाली. आम्ही परतूर येथील अग्निशमन दलाला तात्काळ माहिती दिली असून, त्यांनी शोध कार्य सुरू केले आहे.

मच्छिमारी करून करुन उदरनिर्वाहसंतोष दत्तराव हिरवे हा कानडी गावचा जावई आहेत. मागील ३ वर्षांपासून पूर्णा नदीकाठावर कुडाचे घर तयार करुन ते कुटुंबासह राहत होते. अत्यंत हालाखीची परिस्थिती असून, मच्छिमारी करुन ते पत्नी, एक मुलगी, चार मुलांचा उदरनिर्वाह करीत होते.

टॅग्स :JalanaजालनाriverनदीAccidentअपघात