शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

निपाणी पिंपळगाव येथे पाणी भरताना विहिरीत पडून महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:31 AM

घनसावंगी तालुक्यातील निपाणी पिंपळगाव येथील सुदामती गंगाधर मिठे (वय ३५) या गुरूवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास गावातील विहिरीवर पाणी भरत असताना, पाण्यासाठी झालेल्या गर्दीमूळे त्या विहिरीत पडल्याने त्यांच्या मेंदूला मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कराणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील निपाणी पिंपळगाव येथील सुदामती गंगाधर मिठे (वय ३५) या गुरूवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास गावातील विहिरीवर पाणी भरत असताना, पाण्यासाठी झालेल्या गर्दीमूळे त्या विहिरीत पडल्याने त्यांच्या मेंदूला मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने जालना येथील एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.निपाणी पिंपळगावात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावाला एका टँकरने तालुक्यातील बोडखा या ठिकाणाहून पाणीपुरवठा सुरु आहे. या टँकरच्या दररोज तीन फेऱ्या होणे गरजेचे आहे. पंरतु, या टँकरची सकाळी एक आणि रात्री एक अशा दोनच फे-या होत आहेत. यामुळे पाणीटंचाई अधिक गडद झाली आहे. टँकरचे पाणी गावातील एका सार्वजनिक विहिरीमध्ये आणि एका आडामध्ये सोडण्यात येते.गावामध्ये गुरूवारी रात्री ८ वाजता पाण्याचे टँकर आडामध्ये पाणी सोडत असताना आडावर पाणी भरण्यासाठी एकच गर्दी झाली. त्यावेळी ही दुर्घटना घडली. दरम्यान मिठे कुटुंब गरीब असून, उपचारासाठी गावातील नागरिकांनी लोकवर्गणी करून सात हजार रूपये जमा करून दिले.

टॅग्स :Accidentअपघातwater shortageपाणीटंचाई