शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

शेलूदचे धामणा धरण फुटण्याची भीती व्यर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 00:22 IST

शेलूद येथील धामणा धरणाच्या सांडव्याला पडलेल्या चिरांमधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी धरण फुटण्याची भीती व्यर्थ असल्याचे सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरणाच्या सांडव्याला पडलेल्या चिरांमधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे.या गळतीमुळे धरण फुटण्याची चर्चा बुधवारी सकाळीच या भागात सुरू झाली होती. परिणामी धरणाच्या खालील शेलूद, लेहा, पारध खु, पारध बु, या गावांसह बुलडाणा जिल्ह्यातील म्हसला या गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी अभियंत्यांच्या चर्चेनंतर धरण फुटण्याची भीती व्यर्थ असल्याचे त्यांनी गावकऱ्यांशी बोलताना सांगितले.भोकरदन तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असून, मंगळवारीही दमदार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील धामणा धरणात ८५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. मात्र, मंगळवारी रात्रीपासूनच सांडव्याच्या खालच्या बाजूस पडलेल्या चिरांमधून ५ ते ६ ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. त्यामुळे धरण फुटण्याची चर्चा परिसरात सुरू झाली आणि नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, तहसीलदार संतोष गोरड, कनिष्ठ अभियंता एस.जी.राठोड आदींनी धामणा धरण परिसराची पाहणी केली. पाहणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिका-यांना गळती रोखण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी गटविकास अधिकारी अरुण चोलवार, सहायक पोलिस निरीक्षक शंकर शिंदे, नायब तहसीलदार के. टी. तांगडे, राजेंद्र देशमुख, मनीष श्रीवास्तव, सभापती कौतिक जगताप, गजानन तांदुळजे, श्रीराम खडके, यांच्यासह तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, या परिसरातील नागरीक उपस्थित होते. यावेळी नागरिकांनीही जिल्हाधिकारी बिनवडे यांना पडणारे प्रश्न उपस्थित करून शंका मांडल्या.१९७२ साली बांधले होते धरणशेलूद व परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघावा म्हणून १९७३ ला हे धरण बांधून पूर्ण झाले होते.या धरणाची साठवणूक क्षमता ०.७२ द.ल.घ.मी. एवढी असून, आज घडीला यामध्ये ९.२ द.ल.घ.मी. एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे हे धरण तुडुंब भरले आहे. या धरणामुळे परिसरातील १ हजार ७८८ हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, अशी अपेक्षा होती. २०१३ नंतर हे धरण पहिल्यांदाच ओव्हरफ्लो झाले आहे.जिल्हाधिकाºयांचा ट्रॅक्टर आणि पायी प्रवासशेलूद येथील धरण फुटण्याच्या भीतीने बुधवारी दिवसभर परिसरात घबराटीचे वातावरण होते. परंतु नागरिकांना दिलासा देण्यासह प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी बिनवडे व अन्य अधिका-यांनी शेलूद येथे दुपारी भेट दिली.त्यावेळीदेखील रिमझीम पाऊस पडत असल्याने धरणापर्यंत जाण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, अभियंता एस.जी. राठोड यांनी ट्रॅक्टरमधून वाट काढली.तसेच काही ठिकाणी जिल्हाधिकाºयांनी पायी जाऊन पाहणी करून स्थितीचा आढावा घेतला. यावेळी शेलूदसह पारध बुद्रुक, पारध खुर्द, लेहा तसेच बुलडाणा जिल्ह्यातील मसला, टाकळी, सातगाव या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

टॅग्स :Damधरणcollectorजिल्हाधिकारीRainपाऊस