शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

भोकरदन येथे मोटरसायकल अपघातात बापलेकासह एकाचा मृत्यू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 19:23 IST

खादागाव  फाटीजवळ या दोन्ही दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली. 

भोकरदन ( जालना ) : दोन मोटर सायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तिघेजण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास तालुक्यातील हसनाबाद खादगाव फाटीजवळ घडली. शेरु पठाण, जुबेर पठाण, अशोक कडूबा जाधव असे मयताचे नाव आहे. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी आहेत.

३१ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान शेरखॉ महम्मदखॉ पठाण (५६) व त्यांचा मुलगा जुबेरखॉ शेरखॉ पठाण (२८) हे औरगाबाद येथून दुचाकीवर ( एम.एच. २१, ००८५ ) हसनाबादकडे येत होते. तर  योगेश कडुबा जाधव (२५) योगेश काकासाहेब मानकापे (२४) आणि रवी  बन्सीधर मते (२०) ( तिघेही रा. जातेगाव ता़ फुलब्री) हे एकाच दुचाकीवर ( एमएच २० ई.एक्स १६९८ ) फुलंब्रीकडे सुसाट जात होते. हसनाबाद ते तळेगावच्या मार्गावर असलेल्या खादागाव  फाटीजवळ या दोन्ही दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली. 

या भीषण अपघातात शेरखॉ महम्मदखॉ पठाण व त्याचा मुलगा जुबेरखॉ शेरखॉ पठाण हे दोघे बापलेक डोक्याला जबरदस्त मार लागल्याने जागीच ठार झाले. तर यावेळी गंभीर जमखी असलेल्या योगेश कडूबा जाधव याचा हसनाबाद येथील प्राथमिक उपचार केंद्रात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि हसनाबाद पोलिसांनी जखमींना तातडीने हसनाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय (घाटी) येथे हलविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातJalanaजालना