शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी गुंज येथील ग्रामस्थांचे गोदापात्रात उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:23 IST

घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी (शिवणगाव) बंधा-यातून पाणी सोडण्याच्या मागण्यासाठी गत पाच दिवसांपासून गुंज येथील गोदापात्रात उपोषण चालू केले आहे.

ठळक मुद्देजनावरांसह उपोषण : शिवणगाव बंधाऱ्यातून पाणी सोडण्याची मागणी, उपोषणाचा चौथा दिवस, प्रशासनाच्या वेळकाढू धोरणाने चीड

कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी (शिवणगाव) बंधा-यातून पाणी सोडण्याच्या मागण्यासाठी गत पाच दिवसांपासून गुंज येथील गोदापात्रात उपोषण चालू केले आहे. परंतु अद्याप कडा प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नसल्याने उपोषणकर्त्यामध्ये संतापाचे वातावरण आहे. कडा प्रशासनाकडून वितरिका क्र. ३२ च्या माध्यमातून पाणी सोडण्याचे सांगण्यात आले आहे तर उपोषणकर्ते यांचे शिवनगाव येथील बंधारातूनच सोडण्याचा निर्णय असल्याने सलग पाच दिवसापासून हे उपोषण सुरू आहे.उपोषणस्थळी सिचन विभागाचे शाखा अभियंता पी. एस. खर्से, एम. एस. शेलार, वैदयकीय अधिकारी सुरेश देवडे यांनी भेट दिली आहे. शिवणगाव बंधाºयात सध्या २६.५८ पाणीसाठा उपलब्ध असून, सीआर ७३ च्या माध्यमातून राजा टाकळी (शिवनगाव) बंधाºयात पाणीसाठा चालू आहे. तर ते पाणी शिवणगाव बंधाºयात अडवले असल्याने खालील गावांना पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे गुंज,भादली, सिरसवाडी, रिदोरी, हिवरा, गव्हाण थडी, काळेगाव येथील ग्रामस्थांनी ८ फेब्रुवारीपासून मुलाबाळांसह, जनावरे घेऊन उपोषणाला सुरुवात केली आहे. शिवणगाव बंधाºयात जास्तीचे पाणी सोडून खालील गावांना पाणी सोडावे, ही मागणी मान्य करावी, यासाठी उपोषणाला सुरुवात केली आहे.याबाबत सिंचन विभागाकडून वरिष्ठांशी चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. उपोषणात सरपंच भीमाशकर धनवडे, गजानन तौर, ज्ञानेश्वर कचरे, अवधूत जाधव, गणेश हुबे, शिवाजी घुमरे, आसाराम पवार, प्रकाश काजळे, अभय गुंजकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती आहे. तर दिलेल्या निवेदनात सुमारे ७५ ग्रामस्थांच्या स्वाक्षºया आहेत.आठ दिवसात चौथे अदोलनसीआर क्र. ७३ मध्ये पाणी सोडून बंधाºयात पाणी सोडण्यासाठी पाहिले आंदोलन करण्यात आले. यात यश आले असून, दुसºयाच दिवसापासून पाणी खाली सोडण्यासाठी परत आंदोलन करण्यात आले. त्यानंतर ९१ सीआरमधून कालिका वस्ती,चांगतपुरी, काळेगावथड्डी यांनी अतिवाहकाच्या माध्यमाद्वारे पाणी सोडण्यासाठी आंदोलन केले. ते उपोषणही सोडण्यात आले. आता याच धर्तीवर गुंजसह परिसरातील गावांना पाणी शिवणगाव बंधाºयात सोडण्यासाठी मागील पाच दिवसापासून गुंज येथील गोदावरी नदीपत्रात धरणे आंदोलन सुरू आहे.

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीagitationआंदोलन