शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'पुन्हा आमरण उपोषण, गावात नेत्यांना बंदी'; मनोज जरांगेंनी २५ ऑक्टोबर नंतरच शेड्युलच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 10:10 IST

गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे.

जालना- गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मराठा समाजासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे- पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज मंगळवार २४ ऑक्टोबरला संपत आहे, अजुनही सरकारकडून कोणतीच घोषणा केलेली नाही. आजचा दिवस शेवटचा असणार आहे. आज आरक्षण जाहीर केले नाहीतर पुन्हा एकदा आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भात आता मनोज जरांगे पाटील यांनी पुढचं आंदोलन कसे असणार आहे याची माहिती दिली आहे. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आज आणि उद्यापर्यंत मुख्यमंत्री जाहीर करतील, एकनाथ शिंदे शब्दाला पक्के आहेत. आज किंवा उद्या कोणतीही घोषणा झाली नाहीतर तर २५ ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू होणार. नेत्यांनी आमच्या गावात यायच नाही, आम्ही तुमच्याकडे येत नाही, तुम्ही आमच्याकडे यायचं नाही. गावागावात, शहरात जनजागृती होणार,  हे सर्व आंदोलन शांततेत होणार पण त्यांना पेलणार नाही, असंही जरांगे पाटील म्हणाले. 

" मराठा समाजाने नेत्यांना आतापर्यंत आपलं समजलं होतं. आता तुम्ही आरक्षण घेऊन या मगच तुम्हाला आम्ही गावात घेतो, जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत नेत्यांना गावात बंदी असणार आहे. आम्ही तुम्हाला आरक्षण मागितलं आहे, तुम्ही आम्हाला आरक्षण द्या, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

१ कोटी ४० लाख कागदपत्रांचा तपास

 

मराठ्यांना कुणबी आरक्षण देण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे कामकाजही अद्याप संपले नसून अवघ्या महिनाभरात कोट्यवधी कागदपत्रांतील नोंदी तपासणे समितीला अशक्य झाले आहे. 

मोडी आणि ऊर्दू लिपीतील १ कोटी ४० लाख कागदपत्रे तपासण्यात आली असून, आणखी मोठ्या प्रमाणावर कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी कमिटी २६ ऑक्टोबरपासून तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहे. मराठा आरक्षणासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करीत आहे. समितीचा आणखी अभ्यास करायचा असल्याने २ महिन्यांची मुदतवाढ मिळणार आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण