शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मोदींना शेतकरीच घराचा रस्ता दाखवतील : धनंजय मुंडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 16:36 IST

आगामी निवडणुकीत शेतकरी आणि जनता मोदींना घरचा रस्ता दाखवतील अशी टीका

जालना : प्रधानमंत्र्यांच्या सभेत भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मंत्री व्यासपीठावर असतात हे मोदींना कसे चालते असा सवाल उपस्थित करून विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मोदींना शेतकरीच घराचा रस्ता दाखवतील अशी जोरदार टीका केली. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार यात्रेत घनसावंगी येथे बोलत होते. 

ते म्हणाले की, गेल्या साडेचार वर्षात अच्छे दिनच्या नावाखाली महागाई वाढत गेली. २०१४ मध्ये ५५ लीटर असलेले पेट्रोल आज ८० रूपयांवर पोहोचले आहे. पंतप्रधान स्वत:ला चौकीदार म्हणवतात. असे असताना मेहुल चोक्सी आणि विजय मल्ल्या, निरव मोदी हे देश सोडून जातात कसे असा सवाल त्यांनी केला. यासोबतच सोलापूर येथे पंतप्रधान मोदी आले असताना भ्रष्टाचाराचा आरोप असलेले सहकारमंत्री सुभाष देशमुख हे व्यासपीठावर होते. ते त्यांना कसे चालतात असा सवाल उपस्थित करून आगामी निवडणुकीत शेतकरी आणि जनता मोदींना घरचा रस्ता दाखवतील असेही ते म्हणाले. तसेच खा. रावसाहेब दानवे यांच्यावर टिका करताना त्यांनी शेतकऱ्यांबद्दल दानवेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. 

भुजबळांची शिवसेनेवर टीका यावेळी माजीमंत्री छगन भुजबळ यांनीही त्यांच्या खास शैलीत नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेनेच्या भुमिकेवर टिका केली. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला पटक देंगे असे वक्तव्य केले होते. याच वेळी स्व. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांची ही हिंमत झाली नसती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या ऑडीओ क्लिप सभेत वाजवून दाखविली. त्या कशा फसव्या आहेत हेही स्पष्ट केले. सभेत आ. राजेश टोपे यांनी सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसल्याची टिका केली.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेprime ministerपंतप्रधानCorruptionभ्रष्टाचारFarmerशेतकरी