शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीच्या बियाणांचा तुटवडयाने शेतकरी त्रस्त; जिथे उपलब्ध तिथे अधिक भावात विक्री

By महेश गायकवाड  | Updated: June 5, 2023 16:56 IST

खरीप हंगामात मुबलक प्रमाणात बी-बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात आल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.

भोकरदन : खरीप हंगामातील पेरणीसाठी बी-बियाणांची खरेदी करण्यासाठी भोकरदन शहरातील कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे; परंतु कृषी सेवा केंद्रांना बियाणे उत्पादक कंपन्याच्या डीलर्सनी मागणी केलेल्या बियाणांचा पूर्ण क्षमतेनेे पुरवठा न केल्याने विशिष्ट कंपन्यांच्या बियाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी दुकानदार उपलब्ध बियाणांची चढ्या दराने विक्री करत असून, ८५३ रुपयांची बॅग दीड ते तीन हजारांपर्यंत विक्री करत आहेत.

खरीप हंगामात मुबलक प्रमाणात बी-बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात आल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. मात्र, प्रत्यक्षात सर्वच बियाणे उत्पादक कंपन्यांनी व्यापाऱ्यांना बुकिंग केलेल्या बियाणांपैकी केवळ २० टक्के बियाणांचा पुरवठा केला आहे. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांतच संपूर्ण बियाणांची विक्री झाल्याने शेतकऱ्यांना हव्या असलेल्या बियाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शासनाने कपाशीच्या बॅगच्या किमत ८५३ रुपये ठरवली आहे; परंतु काही निवडक खासगी कंपन्यांच्या वाणाला शेतकरी पसंती देत असल्याने या कंपन्यांच्या बॅगचे भाव दुकानदारांनी वाढवले आहेत. एका बॅगमागे दीड ते दोन हजार रुपये अधिकचे घेतले जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. खरीप हंगामाच्या पहिल्याच आठवड्यात बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. कृषी मार्केटमध्ये कबड्डी, संकेत, पंगा, ब्रम्हा, नवनीत, राशी या वाणांची अधिक मागणी होत आहे.

बियाणे उपलब्ध नाही कपाशीचे बियाणे घेण्यासाठी दुकानावर गेलो असताना हव्या असलेल्या बियाणासोबत इतर कंपन्यांचे पाकीट घेणे बंधनकारक केले जात आहे. ते न घेतल्यास दुप्पट किंमत मोजावी लागत आहे. हवे असलेले बियाणे मिळत नाही.- कैलास सुसर, शेतकरी, भोकरदन

भाव अधिक आहेत सगळ्याच दुकानात कपाशीच्या बियाणाचे दुप्पट भाव सांगत आहेत, तर काही ठिकाणी बियाणे शिल्लक नसल्याचे सांगण्यात येत आहेत. कपाशीचे संकेत हे वाण तर मिळेनासे झाले आहे. मिळालेच तर एक बँगसाठी तीर हजार रुपये मोजावे लागत आहे.- जुमान चाऊस, शेतकरी धावडा

तत्काळ तक्रार करा व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात उपलब्ध असलेल्या बियाण्याचा फलक बाहेर लावणे आवश्यक आहे. जर फलक लावला नाही तर कठोर कारवाई करण्यात येईल. शिवाय शेतकऱ्यांनी जागृत होणे अपेक्षित आहे. व्यापारी शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने बियाणे पाकीट विक्री करीत असेल तर तात्काळ कृषी विभागाच्या हेल्पलाइनवर तक्रार करावी.- रामेश्वर भुते, तालुका कृषी अधिकारी, भोकरदन

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीagricultureशेती